शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हर्सूलमध्येच एमआयएमविरोधात पडली होती असंतोषाची ठिणगी, त्यानंतर झाला इम्तियाज जलीलांच्या वाहनावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:47 IST

एमआयएम-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने; 'असा' झाला इम्तियाज जलीलांच्या वाहनावर हल्ला

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील बुधवारी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास जिन्सी भागात प्रभाग क्रमांक १४ मधील आपल्या उमेदवारांसह पदयात्रेसाठी पोहोचले. पदयात्रा काही अंतरावर गेल्यानंतर समोरून काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरैशी समर्थकांसह आले. एमआयएम- काँग्रेसचा मोठा गट समोरासमोर आला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. इम्तियाज जलील एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून निघत असताना काही तरुणांनी त्यांच्या वाहनावरच हल्ला चढविला. या घटनेनंतर जिन्सी भागात तणाव निर्माण झाला होता.

एमआयएम पक्षाने २२ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले. त्याचप्रमाणे तिकीट न मिळालेले पक्षातील कार्यकर्तेही नाराज आहेत. एमआयएमविरोधात अनेक ठिकाणी असंतोष उफाळून आला आहे. मंगळवारी हर्सूल गावात उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी इम्तियाज जलील गेले असताना काही कार्यकर्त्यांनी ‘तुम्हारा हमारा रिश्ता क्या, १४ लाख, १५ लाख’ अशा घोषणा दिल्या. एमआयएमविरोधातील असंतोषाची ठिणगी याच ठिकाणी पडली होती. बुधवारी दुपारी पदयात्रेसाठी इम्तियाज जलील जिन्सी भागात पोहोचले.

पदयात्रा थोड्या अंतरावर पुढे जाताच काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरैशी समर्थकांसह पोहोचले. दोन्ही गट आमनेसामने येताच पोलिसांनी दोघांनाही रोखले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी जमाव प्रक्षोभक होत असल्याचे लक्षात येताच सौम्य लाठीमार केला. प्रकरण अधिक चिघळत असल्याने जलील हे पदयात्रा अर्धवट सोडून काळ्या रंगाच्या कारमध्ये बसून निघाले. काँग्रेस समर्थक तरुणांनी वाहनाचा पाठलाग करून हल्ला चढविला. जलील यांच्या सुरक्षेसाठी कारच्या बाहेर लटकणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली. घटनेनंतर सिटीचौकच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी घटनास्थळी दाखल झाल्या. जिन्सी भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एमआयएम उमेदवाराची माघारप्रभाग क्रमांक १४ मध्ये एआयएम पक्षाने चार जणांना उमेदवारी दिली. त्यातील परवीन कैसर खान या माजी नगरसेविकेने निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी अर्ज मागे घेतल्यापासून या प्रभागात काँग्रेसविरुद्ध एमआयएम, असा वाद विकोपाला गेला आहे. काँग्रेसने या प्रभागात एक उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : AIMIM leader's vehicle attacked after tensions rise in Chhatrapati Sambhajinagar.

Web Summary : Tensions escalated in Chhatrapati Sambhajinagar as AIMIM leader Imtiaz Jaleel's vehicle was attacked after a clash with Congress supporters during a rally. The incident followed discontent within AIMIM over ticket distribution and a previous protest, leading to police intervention and heightened security in the Jinci area.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन