शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी औरंगाबादेत, आगामी निवडणूकांची रणनीती आखणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 14:05 IST

MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad: महापालिका निवडणुकीच्या अनुषगांने त्यांचा दोन दिवसीय दौरा आहे.

औरंगाबाद : एमआयएम पक्षाचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी ( MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad) शुक्रवारी सकाळी शहरात दाखल झाले.दिवसभर त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महापालिका निवडणुकीच्या अनुषगांने त्यांचा दोन दिवसीय दौरा आहे. मागील काही दिवसांपासून पक्षात दोन गट पडले आहेत. त्यामुळे ओवेसी यांना शहरात धाव घ्यावी लागली असल्याची चर्चा आहे. आज सकाळी खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृहात खा. असदुद्दीन ओवेसी, इम्तीयाज जलील यांच्या उपस्थितीत आगामी निवडणूक संदर्भात बैठक सुरु झाली आहे. यावेळी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय अडी अडचणी जाणून घेतल्या जात असून विश्रामगृह परिसरात मोठी गर्दी.

औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार औरंगाबाद महापालिका सध्या ११५ नगरसेवक डोळ्यासमोर ठेवून प्रभाग रचनेवर काम करीत आहे. त्यासाठी १२ लाख २८ हजार ०३२ लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती. २०२१ मध्ये जनगणना झाली नाही. लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेतला तर भविष्यात औरंगाबादची लोकसंख्या १४ ते १६ लाखांच्या आसपास येईल. एवढ्या लोकसंख्येसाठी १२६ किमान आणि जास्तीत जास्त १५६ नगरसेवक करता येईल. सदस्य वाढ १७ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असेही शासनाने म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत भविष्यात १२५ ते १३० सदस्य राहतील.

नवीन वॉर्ड झाल्यास गुंठेवारीतच जास्तीचे वॉर्डवाढीव लोकसंख्येच्या आधारे महापालिका हद्दीत १२६ ते १३० वॉर्ड होणे शक्य आहे. यामध्ये सर्वाधिक वॉर्ड दाट लोकसंख्या असलेल्या गुंठेवारी वसाहतींमध्ये होण्याची शक्यता आहे. ४५ वॉर्ड म्हणजेच १५ प्रभाग गुंठेवारी वसाहतींमधील असू शकतात, अशी चर्चा आहे. १९९० च्या दशकात शहरात गुंठेवारी वसाहतींचा उदय झाला. सध्या १७४ च्या आसपास गुंठेवारी वसाहतींमध्ये दोन लाखांच्या आसपास मालमत्ता असून, ८ ते १० लाखांच्या आसपास नागरिक या वसाहतींमधून वास्तव्यास असण्याचा अंदाज आहे. कामगार, मजूर, हातगाडीचालक, हातावर पोट असणारे नागरिक वसाहतींमध्ये राहतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी