शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

एमआयएमचा पुन्हा सेना-भाजपला पाठिंबा!

By admin | Updated: June 1, 2016 00:20 IST

औरंगाबाद : सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याऐवजी महापालिकेत एमआयएम या विरोधी पक्षाने स्थायी समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला.

औरंगाबाद : सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याऐवजी महापालिकेत एमआयएम या विरोधी पक्षाने स्थायी समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला. गुरुवार दि. २ जून रोजी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करण्याची ही एमआयएम पक्षाची दुसरी वेळ आहे. माजी आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला एमआयएमने मतदानात पाठिंबा दिला होता.महापालिकेत अतिशय महत्त्वाचे पद समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी आता एमआयएमचा उमेदवार नसेल. सेनेचे उमेदवार मोहन मेघावाले यांच्या निवडीची घोषणाच आता बाकी आहे. महाराष्ट्रात सेना -भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्या एमआयएमने दुसऱ्यांदा घेतलेली ही भूमिका बुचकळ्यात टाकणारी आहे.महाराष्ट्रातील राजकारणाला अल्पावधीत कलाटणी देण्याचे काम हैदराबाद येथील एमआयएम पक्षाने दोन वर्षांपूर्वी केले. मुस्लिम मतांच्या बळावर राज्यात दोन आमदार निवडून आणले. औरंगाबाद महापालिकेत २५ नगरसेवक निवडून आले. २ जून रोजी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होत आहे. त्याचप्रमाणे पाच विविध विषय समित्यांची निवडणूकही याच दिवशी घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत मंगळवार, दि.३१ मे रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती. शिवसेना- भाजपने उमेदवारी अर्ज घेतले. एमआयएमने स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्जच घेतले नाहीत. उद्या १ जून रोजी स्थायी समिती सभापतिपदासाठी युतीचे उमेदवार मोहन मेघावाले अर्ज दाखल करणार आहेत. विषय समिती सभापतीचे उमेदवारही दुपारी ३.३० वाजेपर्यंत या विहित मुदतीत अर्ज दाखल करतील.महापालिकेत २५ आणि एका अपक्ष नगरसेवकासह विरोधी पक्ष म्हणून एमआयएमने निवडणुकांमध्ये आपले उमेदवार देणे क्रमप्राप्त होते. एमआयएमने एकाही निवडणुकीत उमेदवार दिला नाही. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध होत आहे, हे विशेष.महापालिकेत वर्षभरापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमने गंगाधर ढगे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीतही एमआयएमकडे बहुमत नव्हते. ४ढगे यांचा पराभव अटळ आहे, याची जाणीवही पक्षाला होती. तेव्हाच एमआयएमने महापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होऊ द्यायला हवी होती. ४अचानक एमआयएमने स्थायी समिती सभापती निवडणुकीत यू टर्न का घेतला यावर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.मागील एक वर्षापासून एमआयएम पक्षातील नगरसेवकांमध्ये ज्वालामुखी खदखदत आहे. पक्षात लोकशाही मूल्य अजिबात नाहीत. हुकूमशाही कारभाराला सर्वच नगरसेवक कंटाळले आहेत. एमआयएमकडून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अनेकजण काँग्रेस-राष्ट्रवादी कल्चरमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांना हैदराबादी ‘शेरवाणी’कल्चर पचायला तयार नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून जावेद कुरैशी यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत खदखद अधिक वाढू लागली आहे.स्थायी समितीमध्ये एमआयएम पक्षाचे चार सदस्य आहेत. युतीकडे ११ सदस्य आहेत. बहुमत युतीकडे असल्यामुळे आम्ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. पराभूत होण्यासाठी निवडणूक लढविण्यात काय अर्थ आहे.-इम्तियाज जलील, आमदार,मित्रपक्षांचा नकारस्थायी समिती व इतर विषय समित्यांमध्ये एमआयएमसोबत काँग्रेस व इतर पक्ष येण्यास तयार नाहीत. आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही निवडणुकीतून माघार घेतली.-नासेर सिद्दीकी, गटनेता, महापालिका1एमआयएमच्या नगरसेवकांना विविध आमिषे दाखविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच आ. इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाचे उत्तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक खाजा शफोद्दीन यांनी दिले.2एमआयएमने हैदराबादहून नगरसेवक आणले नाहीत. जे नगरसेवक एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले आहेत, ते कालपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. एमआयएम पक्षात त्यांची घुसमट होत असेल तर ते स्वगृही परतणार आहेत.