शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

माईल्ड स्टील बॉडीच्या ६२ बस धावत आहेत रस्त्यावर; लाल बसची बांधणी झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:35 IST

एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या लाल बसची निर्मिती आणि पुनर्बांधणी दोन्ही बंद झाली आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या लाल बसची निर्मिती आणि पुनर्बांधणी दोन्ही बंद झाली आहे. लाल बसऐवजी कार्यशाळेत चार महिन्यांपासून केवळ माईल्ड स्टीलच्या बसची बांधणी केली जात आहे. कार्यशाळेतून आतापर्यंत स्टील बॉडीच्या ६२ बस रस्त्यावर दाखल झाल्या आहेत.

एस. टी. महामंडळाच्या साध्या बसने (लाल) खेड्यापाड्यांपर्यंत प्रवाशांसाठी सेवा देत ‘लालपरी’ म्हणून ओळख निर्माण केली. या साध्या बसच्या बांधणीत अ‍ॅल्युमिनियमचा वापर केला जात होता. ‘एस. टी.’ चा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी महामंडळाने माईल्ड स्टीलचा वापर करून बसची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर या बसची बांधणी करण्यात आली. वर्षभरानंतर जुलै महिन्यापासून चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत या बसची नियमित बांधणी सुरू झाली. याठिकाणी आता अ‍ॅल्युमिनियमऐवजी माईल्ड स्टील बॉडीच्या बसची निर्मिती होत आहे.

नव्या चेसीसच्या पुरवठ्याअभावी लाल बसची निर्मिती आधीच ठप्प होती. आता पुनर्बांधणीतही लाल बसचे रूपांतर स्टील बॉडीच्या बसमध्ये होत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत ‘लालपरी’ हद्दपार होणार आहे. स्टील बॉडीच्या बसची बांधणी खाजगी बसला नजरेसमोर ठेवून होत आहे. आरामदायक आसन व्यवस्थेसह विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. माईल्ड स्टीलमध्ये पुढच्या टप्प्यात स्लीपर बसची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळ खाजगी बससेवेला चांगलीच टक्कर देत आहे.

दोन दिवसांत तीन बसचिकलठाणा कार्यशाळेत दोन दिवसांत तीन बसची बांधणी होत आहे. जुलै महिन्यांत ५, आॅगस्टमध्ये ११, सप्टेंबरमध्ये २३ आणि आॅक्टोबरमध्ये आतापर्यंत २३ बसची निर्मिती करण्यात आली आहे. 

कार्यशाळेत बांधण्यात आलेल्या माईल्ट स्टीलच्या बसेस आतापर्यंत नांदेड, लातूर, औरंगाबादसह मराठवाड्यातील विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. चिकलठाणा कार्यशाळेत माईल्ड स्टीलमध्ये स्लीपर बस बांधणीसंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही.- यू. ए. काटे, व्यवस्थापक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा, एस. टी. महामंडळ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटीpassengerप्रवासी