शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातून महसूल गोळा करण्यात 'एमआयडीसी'ची मोठी झेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:57 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) मराठवाड्यात महसूल गोळा करण्यात चांगलीच झेप घेतली आहे.

ठळक मुद्दे ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक कार्यालयाने २०१७-१८ या वर्षात ३९ कोटी ८३ लाख रुपये प्रशासनाच्या तिजोरीत जमा केले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) मराठवाड्यात महसूल गोळा करण्यात चांगलीच झेप घेतली आहे. तीन वर्षांपूर्वी २६ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल प्राप्त केलेल्या ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक कार्यालयाने २०१७-१८ या वर्षात ३९ कोटी ८३ लाख रुपये प्रशासनाच्या तिजोरीत जमा केले.

‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, चिकलठाणा, शेंद्रा, पैठण, बीड, धारूर, पाटोदा, माजलगाव, आष्टी, जुना जालना, जालना फेज-१, फेज-२, फेज-३, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड येथील औद्योगिक वसाहती येतात. औद्योगिक वसाहती स्थापन करणे, त्यासाठी भूखंड वाटप करणे, उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी एमआयडीसी पार पाडते. या सगळ्या माध्यमातून महसूल जमा होतो. २०१५-१६ यावर्षी उद्योग संजीवनी योजना, अनधिकृत पोटभाडे, अधिकृत पोटभाडे, भूखंड वाटप, भूखंड हस्तांतरण, अनधिकृत मोबाईल टॉवर यातून २६ कोटी ५० लाख ९३ हजार रुपयांचा महसूल जमा झाला होता. २०१७-१८ या वर्षात अनधिकृत पोटभाडे, अधिकृत पोटभाडे, भूखंड वाटप, भूखंड हस्तांतरण, मुदतवाढ यातून ३९ कोटी ८३ लाख ३५ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल २५ कोटी १९ लाखांचा महसूल केवळ भूखंड वाटपातून गोळा झाला. वाळूज येथे १३ भूखंड वाटपातून ३ कोटी ९४ लाख ६५ हजार रुपये मिळाले. पैठण येथे ८ भूखंड वाटपातून ३ कोटी ९ लाख मिळाले. 

शेंद्रा येथे १० भूखंड वाटपातून ८ कोटीगेल्या वर्षभरात एकूण ९९ भूखंड वाटप झाले. यात माजलगाव येथे २७ भूखंड वाटप झाले. यातून २ कोटी ६९ लाख ७३ हजार रुपयांची भर पडली. तर शेंद्रा येथे अवघ्या १० भूखंड वाटपातून तब्बल ८ कोटी ७७ लाख २७ हजार रुपये प्राप्त झाले.  ‘डीएमआयसी’ आणि आॅरिक सिटीमुळे सध्या शेंद्रा येथील भूखंडाला चांगलाच भाव असल्याचे दिसते. ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ म्हणाले, भूखंड वाटपासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. त्यातून स्पर्धा निर्माण होऊन अधिक महसूल मिळतो. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमधून महसुलात वाढ होण्यात मदत होत आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीMarathwadaमराठवाडाTaxकर