शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

एमजीपीची केवळ तांत्रिक मान्यता !

By admin | Updated: November 17, 2015 00:31 IST

हणमंत गायकवाड , लातूर बहुचर्चित उजनीहून लातूरला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेचे श्रेय लाटण्याची स्पर्धा भाजपाच्या नेतेमंडळीत सुरु असली तरी अद्याप या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही़

हणमंत गायकवाड , लातूरबहुचर्चित उजनीहून लातूरला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेचे श्रेय लाटण्याची स्पर्धा भाजपाच्या नेतेमंडळीत सुरु असली तरी अद्याप या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी या योजनेला केवळ तांत्रिक मान्यता दिली असून, पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंगळवारी सकाळी ११ वाजता पोहचणार आहे़ त्यासाठी मनपाचा खास दूत सोमवारी रात्री ११ वाजता लातूरहून मुंबईकडे रवाना झाला आहे़उजनीहून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर महानगरपालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे ४३८२़४८ लाख रुपये अशा ढोबळ रकमेचा प्रस्ताव सादर झाला होता़ या प्रस्तावाची शासन निर्णय २००९ नुसार छाननी करुन जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता़ १० नोव्हेंबर २०१५ रोजी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला़ दरम्यान, या प्रस्तावाला औरंगाबाद येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता व सहमती पत्र दिले आहे़ त्यानुसार प्रशासकीय मान्यतेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे हा प्रस्ताव मनपाच्या अधिकाऱ्यांमार्फत पाठविला जाणार आहे़ सोमवारी रात्री मनपाचा अधिकारी हा प्रस्ताव घेऊन रवाना झाला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता या प्रस्तावाला प्रधान सचिवांकडून प्रशासकीय मान्यता मिळणार आहे़ मात्र लातूर शहरात भाजपाच्या नेतेमंडळींकडून मान्यता मिळण्यापूर्वीच श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरु झाली आहे़ गेल्या तीन-चार दिवसांपासून ही योजना आणण्यास आम्ही कसा प्रयत्न केला़ यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जात आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिलेली ही योजना असून, उजनी धरण ते उस्मानाबाद शहरापर्यंत तीन ठिकाणी पंप बदलणे व वीज वितरण कंपनीची मागणी आदी अनुषंगिक कामे करणे़ त्यासाठी १४ कोटी २६ लाख ८० हजारांचा खर्च दर्शविण्यात आला आहे़ ४उस्मानाबाद जलशुद्धीकरण केंद्राजवळ संपवेल बांधणे व त्यावरील पंप व तेथून शिराढोणपर्यंत पाईपलाईन करणे़ त्यासाठी २५ कोटी ९३ लाख ८२ हजार खर्च होणार आहे़ उजनी धरण ते उस्मानाबाद शहरातील पंप बदलणे, वीज वितरण कंपनीची मागणी व कामे तसेच संपवेल बांधणे आणि शिराढोणपर्यंत पाईपलाईन करणे, या सर्व कामांसाठी ४३ कोटी ८२ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दर्शविली आहे़ या प्रस्तावावर मंगळवारी सकाळी ११ वाजता पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांची स्वाक्षरी होणार आहे़ विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केलेला प्रस्ताव घेऊन लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अशोक पिसाळ मुंबईला सोमवारी रात्रीच रवाना झाले आहेत़ मंगळवारी सकाळी ११ वाजता ते पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या समोर हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी ठेवणार आहेत़ मंगळवारी दुपारी बारा-एक वाजेपर्यंत या प्रस्तावावर प्रधान सचिवांची स्वाक्षरी होऊन प्रशासकीय मान्यता मिळेल, अशी खात्री लातूर महानगरपालिकेनेही व्यक्त केली आहे़ नाहरकत प्रमाणपत्राच्या सर्व प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या बैठकीतच पूर्ण झाल्या आहेत़ फक्त प्रशासकीय मान्यता राहिली असून, तो मार्गही मंगळवारी सुखकर होणार असल्याचे मनपातील अधिकाऱ्यांनी सांगितले़