शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

एमजीएम, बँकर्स, महावितरण संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:43 PM

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एमजीएम, कम्बाइंड बँकर्स व महावितरण अ संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. गुरुवारी झालेल्या सामन्यात सय्यद फरहान, दीपक पाटील व राहुल शर्मा सामनावीर ठरले.

ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : सय्यद फरहान, दीपक पाटील, राहुल शर्मा सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एमजीएम, कम्बाइंड बँकर्स व महावितरण अ संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. गुरुवारी झालेल्या सामन्यात सय्यद फरहान, दीपक पाटील व राहुल शर्मा सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ड संघाविरुद्ध एमजीएम ब संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत ४ बाद १५७ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून सय्यद फरहान याने ३५ चेंडूंतच ६ चौकार व एका षटकारासह ५0 धावा केल्या. शेखर ताठेने २ चौकार, २ षटकांरासह ४५, प्रमोद राऊतने ११ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह १९ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी ड संघाकडून सिराज काझी व वसीम शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी ड संघ ८ बाद १५१ धावा करू शकला. त्यांच्याकडून वसीम शेखने ५३ चेंडूंत ४ षटकार व ५ चौकारांसह ६८, मोईज शेखने ४१ धावा केल्या. एमजीएमकडून प्रमोद राऊतने २४ धावांत ३, तर रवींद्र काळे व आनंद बर्फे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात कम्बाइंड बँकर्सने १९ षटकांत सर्वबाद १२२ धावा केल्या. त्यांच्याकडून अमेय अंकुलेने ३0, निखिल मुरुमकरने १७ व दीपक पाटीलने १६ धावा केल्या. मध्यवर्ती कार्यशाळा संघाकडून शिवाजी नवगिरे व रोहिदास गुंजल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मध्यवर्ती कार्यशाळा ७२ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून विशाल मुकुटमलने ४ चौकारांसह २0, महेश वैद्यने २१ धावा केल्या. बँकर्सकडून दीपक पाटीलने ९ धावांत ४ गडी बाद केले. अमेय उंकुले व अशोक पोटलवाड यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.तिसºया सामन्यात महावितरण अ संघाने २0 षटकांत २ बाद २0६ धावांचा डोंगर रचला. त्यांच्याकडून राहुल शर्माने ५९ चेंडूंत ३ षटकार व ९ चौकारांसह ९0 धावा केल्या. इनायत अलीने ६ चौकारंसह ३७, स्वप्नील चव्हाणने २८ चेंडूंत ३ षटकार व ५ चौकारांसह ५२ धावा केल्या. राहुल शर्मा व स्वप्नील चव्हाण यांनी दुसºया गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी केली. जिल्हा वकील अ संघाकडून दिनकर काळे व कीर्तिकुमार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जिल्हा वकील संघ ५ बाद ११0 पर्यंत मजल मारू शकला. त्याच्याकडून मोहित घाणेकरने १८ व शमी खानने १४ धावा केल्या. महावितरणकडून इनायत अलीने २, तर राहुल परदेशी, योगेश मागसरी व सचिन पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून आर. नेहरी, उदय बक्षी, सय्यद जमशीद, बाळासाहेब वाघमारे यांनी काम पाहिले. गुणलेखन तन्मय ढगेने केले.उद्या, शुक्रवारी सकाळी ७.३0 वाजता एमजीएम अ वि. शहर पोलीस ब, ११ वा. उच्च न्यायालय वकील वि. वैद्यकीय प्रतिनिधी ई व दुपारी २ वाजता कम्बाइंड बँकर्स अ वि. महावितरण ब यांच्यात सामने खेळवले जाणार आहेत.