शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’

By विकास राऊत | Updated: October 15, 2023 14:28 IST

सोलापूर- धुळे महामार्गाच्या कामात तीन हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता, हा प्रकल्पही बारगळला

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा शेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्प आता जवळपास गुंडाळल्यात जमा आहे. ‘हा प्रकल्प होणे नाही’, अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, ‘लोकमत’देखील गडकरी यांना या प्रकल्पांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. गडकरी एका समारंभासाठी शुक्रवारी शहरात होते.

२४ एप्रिल २०२२ रोजी गडकरी यांनीच या प्रकल्पांची घोषणा केली होती. महापालिका स्मार्ट सिटीने मेट्रो आणि उड्डाणपुलासाठी डीपीआरदेखील तयार केला; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआयने) याबाबत हात वर केले. असा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे मध्यंतरी पालिका स्मार्ट सिटी कार्यालयाला कळविले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. शहरातील काही उद्योजक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी गडकरी यांची भेट घेतली. मात्र, गडकरी यांच्याकडून नकारघंटा आल्याने त्यांचा हिरमोड झाला.

औट्रम घाटातील बोगदा बारगळला !छत्रपती संभाजीनगर ते फर्दापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मंत्री गडकरी यांनी निधी दिला. सध्या त्या रस्त्याचेही २० टक्के काम बाकी आहे. संभाजीनगर ते पैठण या रस्त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. सोलापूर- धुळे महामार्गाच्या कामात तीन हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता. मात्र, वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे बोगद्याचा प्रस्ताव रद्द झाला. बोगद्याच्या पर्यायाचा दोन वर्षांपासून शोध सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग