औरंगाबाद, दि. 1 - नवीन औरंगाबाद गणेश महासंघाच्यावतीने शुक्रवारी सकाळी गणपती बाप्पाची आरती स्थानिक मुस्लिम रहिवाशांच्या हस्ते करण्यात आली. गजानन मंदिरजवळील नवीन औरंगाबाद महासंघाच्या श्री गणेशाची आरती करुन मुस्लिम समाजानं यावेळी एकतेचा संदेश दिला. यावेळी मुन्शी पटेल, बाबा शेख, हाशम पटेल, मेहबूब भाई बागवान, बदरुद्दीन मामु, शेख अखील, जावेद खान, नबी पटेल, छोटू पटेल, रहीम पटेल, कादर शहा, अब्दुल रशीद खान, कय्युम पठाण, अब्दुल रजजाक पटेल, शेख साहेबलाल पटेल, इलियाज पटेल, युसूफ खान, अय्युब हबीब खान, जी.के.शेख सर आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबादमध्ये मुस्लिम नागरिकांनी बाप्पाची आरती करुन दिला एकतेचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 15:41 IST