शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४३.६ अंशांवर : २६ एप्रिल १९५८ रोजी होते इतकेच तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:34 IST

शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, शनिवारी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला.

ठळक मुद्दे६१ वर्षांनंतर तापमानाचा रेकॉर्ड

औरंगाबाद : शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, शनिवारी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला.एप्रिल महिन्याच्या प्रारंभी काही दिवस तापमानाने चाळिशी पार केली होती. त्यानंतर अवक ाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. २३ एप्रिलपासून शहराच्या कमाल आणि किमान तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपारी उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतरही वातावरणात प्रचंड उकाडा कायम राहत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.या मोसमामध्ये शहरात ४ एप्रिल रोजी तापमान ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यानंतर तापमान ४० अंशाजवळ कायम होते. मात्र, १६ एप्रिल रोजी शहरातील तापमानात ७ अंशांची घसरण झाली आणि ४२ अंशांवर गेलेला पारा मंगळवारी थेट ३४.८ अंशांपर्यंत घसरला; परंतु चार दिवसांपासून तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, शनिवारी कमाल तापमान ४३.६ अंशांवर गेले, तर किमान तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही मोठी वाढ झाली असून, उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.यापूर्वी असे राहिले तापमानशहरात यापूर्वी २६ एप्रिल १९५८ मध्ये ४३.६ अंश तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर १७ एप्रिल २०१० रोजी ४३.५ अंश तापमान होते. त्यानंतर बहुतांश वर्षी एप्रिलमध्ये तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांदरम्यान राहिला. मात्र, १९५८ नंतर पुन्हा एकदा शनिवारी तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर गेला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTemperatureतापमान