शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

महिलांच्या आरक्षित जागेवर पुरुषांचा ‘कब्जा’

By admin | Updated: August 2, 2014 01:50 IST

सोमनाथ खताळ, बीड महिला, ज्येष्ठ नागरीक, पत्रकार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, अंपग, महामंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आरक्षीत जागा असते.

सोमनाथ खताळ, बीडमहिला, ज्येष्ठ नागरीक, पत्रकार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, अंपग, महामंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आरक्षीत जागा असते. मात्र या आरक्षीत जागेवर सर्रास धनदांडगे, पुरूष, तरूण कब्जा करीत असल्याचे लोकमत ने केलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले. गुरूवारी येथील बसस्थानकात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाहणी करण्यात आली. यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे याचे कुठलेही गांभीर्य महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसून येत आहे.राज्य परिवहनच्या प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक योजना आहेत. प्रत्यक्षात याची कुठेही अंमलबजावणी होत नाही. महिला प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये काही आसने महिलांसाठी आरक्षीत ठेवली. मात्र, सामाजिक जाणिवेचा विसर पडलेल्या पुरूष प्रवाशांकडून त्यावर अतिक्रमण केले जात असल्याचे समोर आले आहे. याकडे महामंडळातील अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.असा आहे नियमएखादी लांब किंवा मध्यम पल्ल्याची गाडी असेल तर ज्याठिकाणाहून बस निघाली त्या ठिकाणी बस निघण्याचा आगोदर पाच मिनीटाने जागा आरक्षीत करणे आवश्यक आहे, आतमध्ये कोठेही ते राखीव जागेवर बसू शकत नाहीत. तर जनता गाडीत (आडनरी) कुठल्याही ठिकाणाहून महिला बसमध्ये आली की, तीला तीच्या आरक्षीत जागेवर बसण्याचा अधिकार आहे. कोणत्याही पुरूषाला ती हक्काने त्या जागेवरून (सामाजिक जाणीव ठेवून)उठवू शकते. आरक्षीत जागेचा हक्क प्रत्येकाने नियमाने मागावा, असे विभागीय नियंत्रक पी.बी.नाईक यांनी सांगितले.पाहणी करून कारवाई करूज्या गाड्यांमध्ये आरक्षीत जागेवर अतिक्रमण केले जात आहे, याची आम्ही पाहणी करू. प्रवाशांनीही आपला हक्क आमच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधून मागावा. काही अडचणी वाटल्यास सदरील कर्मचाऱ्याची तक्रार आमच्याकडे करावी. विशेष म्हणजे याविषयावर जागृती होणे आवश्यक आहे, असे विभागीय वाहतूक अधिकारी जी.एम.जगतकर, आगारप्रमुख ए.यू.पठाण यांनी सांगितले.असा आला अनुभव...एम.एच. २० बी.एल. ११७९- विनाथांबा (औरंगाबाद) या बसमध्ये आम्ही दुपारी प्रवेश केला. यामध्ये भरपूर गर्दी होती. महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर दोन सुशिक्षीत व्यक्ती बसलेल्या होत्या व काही वृद्ध स्त्रिया उभ्या होत्या. आम्ही या प्रवाशांना उठण्यास सांगितले असता, ते म्हणाले या आजी काय माझ्या नातेवाईक नाहीत, तर मी का उठू? असे सांगितले. यावरून सुशिक्षीत व्यक्तीच नियमांचे उल्लंघण करीत असून त्यांना सामाजिक जाणिवेच भान राहिलेले नाही, असे दिसून येते.सर्वेक्षणात आढळून आलेली स्थितीआम्ही गुरूवारी लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जनता गाड्यांची पाहणी केली. यामध्ये २८ बसमध्ये राखीव जागेवर दुसरीच व्यक्ती बसल्याचे दिसून आले. दोन गाड्यांमध्ये योग्य परिस्थिती होती. यातील १० बसमध्ये गर्दी खुप होती. यामध्ये महिला उभ्या असल्याचे दिसून आले. वाहकाला याचे गांभिर्य नव्हते. या सर्व उभ्या असलेल्या महिला सशिक्षीत व असुशिक्षीत असाव्यात असे दिसून आले.यांच्यासाठी आहे जागा आरक्षितबसमध्ये एकुण ४४ प्रवाशांसाठी जागा असते. यातील महिला-६, ज्येष्ठ नागरीक-२, पत्रकार-२, विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य-२, अंपग-२, महामंडळाचे कर्मचारी-२ अशा जागा राखीव आहेत.