शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात सुरु होणार ‘मेमरी क्लिनिक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 12:21 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वार्धक्यशास्त्र विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे घाटीत ‘मेमरी क्लिनिक ’ सुरू करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देओपीडी-१४२ येथे दररोज दुपारी १२ ते १ आणि बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही सेवा मिळणार आहे. वयोमानामुळे वाढणाऱ्या विसराळूपणाचे निदान आणि उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वार्धक्यशास्त्र विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे घाटीत ओपीडी-१४२ मध्ये ‘मेमरी क्लिनिक ’ सुरू करण्यात येत आहे. 

वाढत्या वयाने मेंदूतील रक्तपेशी कमकुवत होतात. रक्तपुरवठा कमी होतो. परिमाणी, विसराळूपणा वाढतो. स्वभावातही बदल होतो. एका हद्दीपर्यंत हे सामान्य असते. थोडाफार विसराळूपणाही ठीक असतो; परंतु हे अति होते, तेव्हा घरच्या लोकांना न ओळखणे, स्वत:चे नावही न आठवणे असा सतत प्रकार होतो. या सगळ्या बाबींचे वेळीच निदान करून रुग्णाला मदत करणे आणि रुग्णाला सांभाळण्यासंदर्भात कुटुंबाला प्रशिक्षण यादृष्टीने ‘मेमरी क्लिनिक’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

ओपीडी-१४२ येथे दररोज दुपारी १२ ते १ आणि बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही सेवा मिळणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्या मंजुरीने हे क्लिनिक सुरू होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलजा राव, मानसोपचार विभागप्रमुख डॉ. संजय घुगे, आरोग्य विभागाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमित टाक आदी यासाठी प्रयत्नशील आहेत. वयोमानामुळे वाढणाऱ्या विसराळूपणाचे निदान आणि उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या ‘मेमरी क्लिनिक ’चे शुक्रवारी सकाळी ११ वाजता उद््घाटन होणार आहे.

उपलब्ध निधीतून उपक्रमजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, एमडी-वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विषयात पदव्युत्तर या अभ्यासक्रमाची मंजुरी मिळविणारे घाटी रुग्णालय राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. पायाभूत सुविधांनी हा विभाग सज्ज आहे. उपलब्ध निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वा अधिक चांगली  वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर म्हणाल्या, वार्धक्यशास्त्रच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘एमसीआय’च्या मानांकनानुसार मेमरी क्लिनिकची गरज असते. छोट्या स्तरावर हे काम सुरू होते. आता जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबर ही सेवा अधिक चांगली आणि मोठ्या स्तरावर होईल.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यdoctorडॉक्टर