लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही नवीन करप्रणाली देशभरात लागू झाली, पण जीएसटीएन नेटवर्कमधील तांत्रिक अडचणी व विवरणपत्रे भरण्यातच व्यापाºयांचा वेळ जात आहे. व्यापाºयांना व्यवसाय सोडून विवरणपत्र दाखल करण्यासाठीची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. त्यामुळे व्यापाºयांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी दिली.शहा म्हणाले की, मागील दोन महिन्यांपासून व्यापारी तणावाखाली वावरत आहेत. केंद्र सरकार दर दोन दिवसांनी नवीन आदेश काढून करप्रक्रिया आणखी जटिल करीत आहेत. सतत नवनवीन नियम आणले जात असल्याने व्यापारीच नव्हे, तर चार्टर्ड अकाऊंटंट, करसल्लागारही सैरभैर आहेत. त्यात भरीसभर म्हणजे जीएसटीएन पोर्टलमध्ये अनेक दोष निर्माण होत आहे.परिणामी, वेळेवर विवरणपत्र दाखल होत असल्याने भुर्दंड करदात्यांनाच सहन करावा लागत आहे. यामुळे संपूर्ण बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षानुवर्ष कर भरणाºया व्यापाºयांवर सरकार अविश्वास दाखवत आहे.व्यापाºयांच्या समस्या सरकारसमोर मांडण्यासाठी नाशिक येथे महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्य सचिव (अर्थ विभाग) राजू जलोटा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.जीएसटी करप्रणाली सुटसुटीत करावी, यावर जर सरकारने काही निर्णय घेतला नाही, तर या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही शहा यांनी सांगितले.
राज्यातील व्यापाºयांची १४ ला नाशिकमध्ये बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:18 IST