शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

खाजगी रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा २४ तास बंद, 'आयएमए'ने पुकारला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:52 IST

बहुतेक रुग्णालयांबाहेरच ‘ओपीडी बंद’चा बोर्ड लावण्यात आला आहे.

औरंगाबाद :शहरात 'आयएमए'ने आज पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील लहान-मोठ्या रुग्णालयातील डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या खासगी रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवण्यात आली आहेत. कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ  सोमवारी (दि.१७) शहरातील खाजगी वैद्यकीय सेवा २४ तासासाठी बंद असणार आहे. 

देशभरातील सर्व रुग्णालये सोमवारी सकाळी ६ ते  मंगळवार सकाळी ६ या २४ तासासाठी बंद असतील. सकाळी ९ वाजता शहरातील 'आयएमए'चे सर्व सभासद समर्थनगर येथील आयएमए हॉल येथे एकत्र आली. यानंतर कोलकाता येथील घटनेचा निषेध करण्यात आला. ‘आयएमए’च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांतीळ डॉक्टर सहभागी झाले आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, एमजीएम हॉस्पिटल या मोठय़ा रुग्णालयांसह अनेक रुग्णालयांतील तसेच दवाखान्यांतील ओपीडी दिवसभर बंद आहे, अशी माहिती 'आयएमए' चे सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी सांगितले. बहुतेक रुग्णालयांबाहेरच ‘ओपीडी बंद’चा बोर्ड लावण्यात आला आहे.

यावेळी डॉ.अनुपम टाकळकर, डॉ.संतोष रंजलकर, डॉ. कुलदीपसिंग राऊळ, डॉ.रमेश रोहिवाल, डॉ.संतोष रंजलकर, डॉ.मंजुषा शेरकर, डॉ.हेमंत फटाले, डॉ.प्रीती फटाले, डॉ.  अपर्णा राऊळ,डॉ .अजय रोटे आदी उपस्थित होते

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय