शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रम राहतोय उपेक्षितच

By admin | Updated: July 24, 2016 00:52 IST

औरंगाबाद : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) शिकविण्यासाठी मराठवाड्यात पूर्णवेळ शिक्षक - निदेशकांची कमतरता आहे.

औरंगाबाद : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) शिकविण्यासाठी मराठवाड्यात पूर्णवेळ शिक्षक - निदेशकांची कमतरता आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून पुनर्रचित अभ्यासक्रम अमलात आला; पण त्यासंबंधीची पुस्तके अद्यापही उपलब्ध नाहीत. शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमाची उपेक्षा थांबणार कधी, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दहावीनंतर किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) शिकविला जातो. १९८९-९० पासून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला शिक्षक- निदेशकांची पदे भरण्यात आली. त्यानंतर कित्येक सेवानिवृत्त झाले, कोणी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापन करू लागले, तर अनेक जण नोकरी सोडून गेले. अशा विविध कारणांमुळे आजघडीला मराठवाड्यात शिक्षक- निदेशकांची जवळपास ४० टक्के पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे महाविद्यालये तसेच शिक्षक संघटनांनी सतत पाठपुरावा केला. मात्र, संचालनालयाने अजूनही परवानगी दिलेली नाही. उद्योग क्षेत्राची गरज आणि तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेऊन ‘एमसीव्हीसी’साठी यंदापासून ( २०१६-१७) नवीन अभ्यासक्रम अमलात आला आहे. ‘एमसीव्हीसी’चे काही अभ्यासक्रम कालबाह्य ठरल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या क्षेत्रात संधी मिळत नव्हती. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होण्याची भीती होती. त्यामुळे काळाची गरज ओळखून उद्योग क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी किंवा स्वत:चा उद्योगधंदा सुरू करता यावा, यासाठी मागणी नसलेल्या जुन्या अभ्यासक्रमांचे रूपांतर नवीन अभ्यासक्रमांत करण्यात आले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने तयार केलेल्या ‘नॅशनल अ‍ॅक्युपेशन स्टँडर्ड लेव्हलनुसार’ नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. यंदापासून तो लागूही झाला; पण अद्याप यासंबंधीची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. वेबसाईटवर अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आलेला आहे.मात्र, नवीन अभ्यासक्रमांबाबत शिक्षकांना प्रशिक्षण दिलेले नाही. असे असताना अभ्यासक्रम बदलाची घाई कशाला, असा सवाल मराठवाडा व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर वानखडे यांनी केला आहे. मराठवाड्यात ३०० महाविद्यालयांमध्ये ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रम शिकविला जातो. यासाठी सुरुवातीला जवळपास २ हजार शिक्षक- निदेशक कार्यरत होते. अलीकडे ५०० हून अधिक जागा रिक्त आहेत. अशासकीय अनुदानित संस्थांमध्ये ‘एमसीव्हीसी’अभ्यासक्रमाचा दर्जा टिकविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक, निदेशक, लिपिक आणि चतुर्थ श्रेणीची पदे भरण्यास संचालनालयाने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अन्यथा आमच्यासमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही, असा इशारा मराठवाडा व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर वानखडे यांनी दिला आहे.