शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर

By विकास राऊत | Updated: July 4, 2024 13:40 IST

३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर : माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन अपलोड होणार आहे. त्यासाठी असलेले ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप अजून सुरूच झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रमाणपत्र घेऊन महिलांनी बुधवारी सकाळी ८ पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी केली. तीन दिवसांत एकाही लाभार्थ्याचा अर्ज योजनेसाठी अपलोड झालेला नाही. कारण ॲपच सुरू झालेले नाही.

अर्ज भरण्यासाठी मुदत, ऑनलाइन प्रक्रिया होणार आहे. असे प्रशासनाने वारंवार सांगूनही महिलांची गर्दी दिवसभर तशीच होती. योजना चांगली आहे, परंतु त्यासाठीची प्रक्रिया किचकट असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. तर योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी साध्या वेशात प्रशासनातील पथक सेतू केंद्रावर टेहळणी (रेकी) करणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जि. प. सीईओ डॉ. विकास मीना यांची उपस्थिती होती.

रहिवासी, उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाहीरहिवासी प्रमाणपत्राऐवजी १५ वर्षांपासून राज्यात राहत असल्याचे पुरावे ग्राह्य धरले जातील. त्यात रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेच्या जन्म प्रमाणपत्रापैकी कुठलाही पुरावा असेल तर रहिवासी प्रमाणपत्राची गरज नाही. महिलांनी पिवळे, केशरी रेशनकार्ड झेरॉक्स प्रत दिली तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल. ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

कोणत्याही बँकेचे खाते चालेलशून्य बॅलन्स असलेले कोणत्याही बँकेचे खाते योजनेसाठी चालेल. यासाठी बँकांना सूचना दिल्या आहेत. आधार लिंक, केवायसी असणे गरजेचे असेल. ऑफलाइन अर्ज घेण्यात येणार नाही. अर्ज ऑनलाइन पाठवावेत. १५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळत असणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अनुदान १ हजार असेल तर ५०० रुपयांचे अनुदान या योजनेतून दिले जाईल. १५०० रुपयांचे एकूण अनुदान देण्याचा प्रयत्न यातून होईल.

अर्जदार काय म्हणतात?योजना चांगली आहे. ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळत नाही, परंतु त्या गरजू आहेत. त्यांना या योजनेतून साहाय्य मिळेल.-अर्जदार, पडेगाव

योजनेसाठी मुदतवाढ हवी. तसेच मोबाइल वापरणे सगळ्याच महिलांना जमत नाही. ऑफलाइन अर्जही घ्यावेत.-अर्जदार, ब्रिजवाडी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागTahasildarतहसीलदार