शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मयूर पार्क की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवले रस्ते, तेथे साचली आता दलदल

By साहेबराव हिवराळे | Updated: July 29, 2023 18:25 IST

५० कोटींतून रस्ते पुन्हा चकचकीत बनण्याची आशा

छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडलगत उदयास आलेल्या मयूर पार्कचे रस्ते छान गुळगुळीत होते. पण जलवाहिनीच्या कामासाठी ते खोदले गेले... पावसाळा सुरू झाला अन् दलदल बनली... स्मार्ट सिटीतून रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मंजूर आहे. यामुळे रस्ते त्वरित पुन्हा गुळगुळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.

हर्सूल टी पॉईंटजवळच बिल्डरने हा प्रकल्प उभारला होता. खूप नागरिकांनी मयूर पार्कमध्ये प्लॉट, फ्लॅट घेतले. सोसायट्या स्थापन केल्या. पण अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले, तेव्हा थातूरमातूर रस्ता केला गेला. तो रस्तादेखील एका पावसात होता की नव्हता झाला. मयूर पार्क, कार्तिकनगर हा चिखल पार्क झालेला आहे. एसबीओए ते देवगिरी बँकेपर्यंत हा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून मंजूर झालेला आहे. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे. महिन्याभरापूर्वी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील या परिसराला भेट दिली होती.

शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणारमयूर पार्क हा शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणार असून, १०० किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकून सर्वांना मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे. जलवाहिनीसाठी रस्ते उखडले. त्याचा पावसामुळे नागरिकांना थोडाफार त्रास झाला; परंतु तो आता कमी होईल. कारण ५० कोटींतून रस्ते पुन्हा गुळगुळीत होणार आहेत.- विजय औताडे, माजी नगरसेवक 

तुम्ही शहरात राहता की खेड्यात...?जेव्हा पाहुणे म्हणतात, तुम्ही खेड्यात राहता की शहरात? तेव्हा निरूत्तर होतो. डांबरी रस्ता पाइपलाइनमुळे उखडला; त्यात पाणी तुंबले. खड्ड्यांचा अंदाज येत नाही.- आशिष जोशी (नागरिक)

समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?एसबीओसमोरचा पूर्वेकडील समांतर रस्ता एक वर्षापासून खोदून ठेवला आहे. तेथे डबके साचते. जनतेला कोणी वाली नाही. घरपट्टी, नळपट्टी वसुली मात्र जोरात सुरू आहे. सध्या नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांनी समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?- विद्या साळवे, रहिवासी

सांडपाण्याची विल्हेवाट कशी? नाले चोकअप असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- अप्पासाहेब चंद्रटिके, रहिवासी

कर नियमितपणे भरतो...रहिवाशांना चार महिने समस्या भेडसावतात. त्यांचे एकदाचे निराकरण करावे, कारण बहुतांश जण मनपाला कर अदा करतात.- ममराज राठोड, रहिवासी

आणखी प्रयत्नांची गरजसविता सुरे, सीताराम सुरे आणि विजय औताडे हे नगरसेवक राहिले असून त्यांनी काही विकासकामे केलेली आहेत. शासनाचाही निधी येथे लोकप्रतिनिधींनी खर्च केलेला आहे. पण आता चिखलमुक्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका