शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत मेअर फेलोंचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:40 IST

महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ठळक मुद्देअधिकारी त्रस्त : काम कमी उपद्व्याप जास्त

औरंगाबाद : महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महापालिकेतील गोपनीय फायलींची पाहणी करणे, फोटो कॉपी करणे, मनपातील डाटा काही विशिष्टांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करीत असल्याचे समोर येत आहे. मेअर फेलो उपक्रमाला आता पूर्णविराम द्यावा, अशी मागणी त्रस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही फेलोंची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर मनपा आयुक्तांनीही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांची मेअर फेलो म्हणून वर्षभरापूर्वी नियुक्ती केली. या १४ विद्यार्थ्यांना दरमहा पगारही खाजगी कंपन्या देत आहेत. त्यांच्या सेवेचा मागील वर्षभरात मनपाला, शहराला किंचितही फायदा झालेला नाही. ज्या विभागात या विद्यार्थ्यांची नेमणूक केली आहे, त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. काही मेअर फेलो फक्त हेरगिरीचे काम करीत आहेत. कोणता अधिकारी किती वेळ कार्यालयात बसतो, कोणता कर्मचारी किती तास काम करतो याची माहिती जमा करून थेट आयुक्तांना देण्यात येत आहे. आयुक्तही मेअर फेलोंवर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांना फैलावर घेत आहेत. वास्तविक पाहता संबंधित कर्मचारी १८ तास काम करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांना कार्यालयात थांबावे लागते. याचे किंचितही भान प्रशासनाला राहिलेले नाही. फेलोंच्या तक्रारींमुळे कर्मचारी, अधिकाºयांचे मनोबल दिवसेंदिवस खालावत आहे. महापालिकेतील काही फायली या अत्यंत गोपनीय असतात. हे फेलो या फायलींचीही हाताळणी करीत असल्याचे समोर आले आहे. अखेर गोपनीय फायलींची फोटो कॉपी मोबाईलमध्ये घेण्याचा त्यांचा नेमका उद्देश काय? असाही प्रश्न कर्मचाºयांकडून उपस्थित करण्यात येतो. ज्या उद्देशासाठी या फेलोंची निवड केली आहे, तो उद्देश बाजूला सारून दुसरीच कामे सध्या सुरू आहेत.------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMayorमहापौर