शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारीस मशाल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:12 IST

Maratha Kranti Morcha, Maratha Reservation साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पिंपळगाव येथून मशाल रॅलीला सुरुवात होईल.

ठळक मुद्देसाष्ट पिंपळगाव येथे २० जानेवारीपासून गावकरी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव ते  औरंगाबाद अशी मशाल रॅली काढली जाणार आहे.

औरंगाबाद: मराठा आरक्षण आणि अन्य विविध मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारी रोजी साष्ट पिंपळगाव ते  औरंगाबाद अशी मशाल रॅली काढली जाणार आहे. क्रांती चौकात रॅलीचा समारोप करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती, संयोजक संजय सावंत यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये दिली.

सावंत म्हणाले, साष्ट पिंपळगाव येथे २० जानेवारीपासून गावकरी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील अनेक गावातील मराठा समाज तिथे जात आहे. मराठा आरक्षण लढाईमध्ये समाजातील ४२ बांधवांनी आत्मबलिदान दिले. १३ हजार ७२६ आंदोलकांविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविले. एवढे सगळे होऊनही सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. यानंतर स्थगिती उठविण्यासाठी शासनाने भरीव कोणतेही काम केले नाही. उलट नोकर भरती जाहीर केली. आरक्षणावरील स्थगिती उठे पर्यंत राज्य शासनाने नोकर भरती स्थगित करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पिंपळगाव येथून मशाल रॅलीला सुरुवात होईल. दुपारी तीन वाजता औरंगाबादेतील चौकात मशाल रॅलीचे समारोप होईल. यानंतर तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल. या पत्रकार परिषदेला अमोल साळुंके, सुभाष भोसले, गणेश उगले, प्रदीप नवले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद