शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिन्सी येथे दवाखान्यात प्रसूतीदरम्यान विवाहिता दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:37 IST

गरोदर महिला प्रसूतीसाठी सिटीजन्स रुग्णालयात दाखल झाली. तिने गोंडस बाळाला जन्मही दिला व त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जिन्सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देबाळ सुखरूप, नातेवाइकांचा गोंधळ : जिन्सी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

औरंगाबाद : गरोदर महिला प्रसूतीसाठी सिटीजन्स रुग्णालयात दाखल झाली. तिने गोंडस बाळाला जन्मही दिला व त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जिन्सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस बंदोबस्तात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत दाखल करण्यात आला. प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची जिन्सी हद्दीतील ही दुसरी घटना होय.बारूदगरनाला येथील फिरदोस बेगम शेख एजाज (२५) या गरोदर महिलेस नातेवाइकांनी सोमवारी रात्री ११ वाजता प्रसूतीसाठी जिन्सी पोलीस ठाण्याशेजारील रुग्णालयात दाखल केले होते. डॉ. सीमा खान यांनी महिलेची प्रसूती केली. तिने बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर फिरदोस बेगम यांनी नातेवाइकांशी संवादही साधला. त्यानंतर मात्र अचानक बाळंतिणीची प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच फिरदोस बेगम हिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत महिला डॉक्टरांना शिवीगाळ करीत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली. प्रचंड फौजफाटा तैनात केल्याने मृत महिलेचे नातेवाईक नरमले. पोलीस निरीक्षक वसूरकर यांनी पोलीस बंदोबस्तात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत रवाना केला. मृत फिरदोस बेगम हिचा पती शेख एजाज हा शहरात स्टोव्ह रिपेअरिंगचे काम करतो. त्यांना तीन मुले आहेत.अहवालात मृत्यूचे कारण कळेलघाटीच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असून, व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवाल मिळाल्यानंतर तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे समजणार आहे. अहवाल मिळाल्यांनतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिन्सी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार हिवराळे यांनी सांगितले. सध्या जिन्सी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

टॅग्स :WomenमहिलाDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद