शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दुसऱ्या दिवशीही बाजार ठप्प..!

By admin | Updated: June 3, 2017 00:41 IST

जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला.

जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी संपात सहभागी होणारे दुसऱ्या दिवशी दिसून आले नाहीत. त्यातच जालना बाजार समितीतील भाजीपाला मार्केट बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, याचा गंभीर परिणाम शनिवारपासून सर्वत्र दिसून येईल, अशी चिन्हे आहेत.कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यात संपाला अनेक स्वयंसेवी संस्थांसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत सहभागही नोंदवला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी संमिश्र परिणाम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून आला. तर शुक्रवारी रांजणी, राणी उंचेगाव आणि माहोरा येथील आठवडी बाजारावर पडसाद उमटले. अंबड, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यांत शेतकऱ्यांच्या संपास अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तर जिल्ह्यात दूध संकलन इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्याने अपवाद वगळता याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. घरोघरी दूध देणारे वा हॉटेल्सचालकांना दूध विक्री कमी झाली. शनिवारपासून दूधटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही आठवडी बाजार भरलेच नाहीत. तर काही सकाळी भरुन दुपारी बंद करण्यात आले. एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या राजकीय नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत संपाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. काँग्रेसने शुक्रवारी संपास पाठिंबा दर्शवला, तर इतरांनी जिल्ह्यात अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. शनिवारपासून संपाची धार अधिक टोकदार होणार असल्याने विरोधकांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. जालन्यासह इतर तालुक्यांतील बाजार समित्यांतील भाजीपाला वगळता इतर व्यवहार सुरळीत होते. तर अंबड, घनसावंगी, बदनापूर यासह काही तालुक्यांत शेतकरी संपाला शेतकरीपुत्र म्हणवून घेणाऱ्यांचा पाठिंबा मिळाला नाही. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे भरत असलेल्या शुक्रवारच्या आठवडी बाजारावर शेतकरी संपाचा परिणाम दिसून आला. बाजारात भाजीपाला विक्रेता दुकानाची संख्या नेहमी पेक्षा कमी दिसून आली. राणीउंचेगाव येथील बाजारामध्ये बहुतांशी भाजीपाला विक्रेते जालना येथील मुख्य बाजारपेठेमधून भाजीपाला खरेदी करून राणीउंचेगाव येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. अखिल भारतीय मराठा महासंघानेही शेतकरी संपास पाठींबा दिला आहे.मंठ्यात विडोळी फाट्यावर शिवमुद्रा प्रतिष्ठानने शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. या संपात शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयसिंह प्रल्हाद बोराडे, एकनाथ काकडे, संतोष मोरे, वायाळ, दिगंबर बोराडे, भगवत गोंडगे,कृष्णा खरात, दीपक बोराडे, सुभाष बोराडे, शेळके , ऋषिकेश बोराडे, शाम काकडे, पवन खरात, योगेश बोराडे, दत्ता खरात, भगवान कुलकर्णी, राहुल खरात, जीवन रणशूर, अक्षय खरात, प्रताप खरात, किरण सोनार, पप्पू अवचार, विशाल शहाणे, आनंद जाधव, राम गोंडगे, अमोल अघाव, अदिनाथ गुंड, अजय बागल, तुकाराम तांगडे, पवन वाघमारे, यशवंत इंगळे, गोपाल बागल, प्रशांत मेहता, सतीश गणगे, सोमनाथ शेळके, रवि देशमुख आदी सहभागी झाले होते.