शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

मरसांगवीला ‘माळीण’ची भिती

By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST

एम़ जी़ मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील मरसांगवी साधारणत: अडीचशे उंबऱ्यांचे गाव़़़ जवळपास शंभरएक वर्षापूर्वीपासून याठिकाणी वस्ती झालेली़

एम़ जी़ मोमीन , जळकोटजळकोट तालुक्यातील मरसांगवी साधारणत: अडीचशे उंबऱ्यांचे गाव़़़ जवळपास शंभरएक वर्षापूर्वीपासून याठिकाणी वस्ती झालेली़़़ डोंगराच्या पायथ्याशी आता चांगलीच पक्की घरे वसली आहेत़ परंतु, आता येथील गावकऱ्यांना ‘माळीण’ दुर्घटनेने जबर धास्ती बसली आहे़ डोंगर खचून मरसांगवीचे माळीण होईल, या भीतीने ग्रामस्थ ग्रासले आहेत़ जळकोटपासून १५ किलोमीटर अंतरावर मरसांगवी या गावाच्या वसाहतीला शंभर वर्षापूर्वी सुरुवात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात़ हळुहळु लोकसंख्या वाढली तशी घरांची संख्याही वाढली़ आज हे गाव अडीचशे उंबऱ्यांचे बनले आहे़ लोकसंख्याही २२४९ इतकी झाली आहे़ पूर्वी शेजारच्याच डोंगरमाथ्यावर वस्ती वसलेली होती़ परंतु, पाण्याची अडचण होऊ लागल्याने हळुहळु वस्ती डोंगराच्या पायथ्याशी उतरली़ तिरु व परठोळ नद्यांच्या संगमावर कालांतराने वस्ती वाढत गेली़ मात्र आजतागायत या गावाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले नसल्याने सर्व काही सुखनैव सुरु होते़ मात्र गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव डोंगराच्या उदरात गडप झाल्याच्या बातम्या वाचून, पाहून मरसांगवीकरांची झोप उडाली आहे़ माळीण दुर्घटनेला महिना झाल्याच्या बातम्या पुन्हा एकदा आल्या अन् मरसांगवीकर खडबडून जागे झाले़ त्यांनी तातडीने सरपंचाशी चर्चा करुन तलाठी व ग्रामसेवकाच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेतली़ गावावर पाऊस धो-धो बरसल्यास दरडी कोसळून माळीण सारखी आपत्ती कोसळण्याची भिती या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केली़ त्याअनुषंगाने गावातील घरांचे पंचनामे करुन गावाचे पुनर्वसन करावे, अशी एकमुखी मागणी करीत ठराव घेण्यात आला़ ठरावाच्या प्रती महसूल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत़ यावर प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे़माळीणची दुर्घटना पाहिल्यापासून डोंगराच्या उदरात गडप झालेले गाव आजतागायत डोळ्याआड झाले नाही़ अधूनमधून येणाऱ्या बातम्यांनी ही भीती ताजी होत आहे़ पावसाला सुरुवात झाली की अजूनही ग्रामस्थांची झोप उडते आणि माळीणचे चित्र डोळ्यासमोर तरळते अशी प्रतिक्रिया सरपंच नजमा बेगम पटेल, ऐनुद्दीन पटेल, बाबु भांडे, तानाजी राठोड, राजकुमार वाघमारे, मैनुद्दीन बिराजदार, संजय वाघमारे, संग्राम देवकते या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या़