शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठवाड्यातील युवकाची दमदार कहाणी; प्राध्यापक होण्यासाठी पैसे नसल्याने व्यवसाय थाटून झाला आत्मनिर्भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:34 IST

सेट-नेट जीआरएफमध्ये उत्तीर्ण; एमफील पूर्ण, पीएच.डी. सुरू

ठळक मुद्देविद्यापीठातील युवकाचा निर्णय आज मिळवतोय ५० हजार रुपये महिना  

- राम शिनगारे

औरंगाबाद :  प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट-नेट परीक्षा जीआरएफमध्ये ५ वर्षांपूर्वीच उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळेना. संस्थाचालकांकडे जावे तर लाखो रूपयांची मागणी करतात. त्यामुळे एम.ए., एम.फिल. पूर्ण करून पीएच.डी.चे संशोधन शेवटच्या टप्प्यात असलेल्या युवकांने चक्क प्राध्यापक होण्याचा नाद सोडून देत व्यवसायाचा मार्ग पत्कारला आहे. व्यवसाय कौशल्यावर आधारित असल्यामुळे सर्व खर्च जाऊन प्रतिमहिना ५० ते ६० हजार रूपयांचा निव्वळ नफाही  मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बेलुरा गावातील सतीश आश्रुबा भोसले हा युवक २०११ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. एम.ए. पूर्ण केल्यानंतर त्याने प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या सेट-नेट परीक्षांची तयारी सुरु केली. दुसऱ्या प्रयत्नातच दोन्ही परीक्षा जीआरएफमध्ये उत्तीर्ण झाला. जीआरएफमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे एम.फिल., पीएच.डी.च्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली. दोन वर्ष एम.फिल.चे संशोधन केले. त्यानंतर पीएच.डी.चे संंशोधन अद्याप सुरू आहे.

मात्र पाच वर्षांच्या कालावधीत पात्र असूनही प्राध्यापक होण्यासाठी कोठेही संधी मिळाली नाही. दोन-तीन ठिकाणी मुलाखती दिल्या. मात्र लाखो रूपयांची देण्यासाठी पैसे नसल्यामुळे शांत बसावे लागले. वय वाढत होते. किती दिवस नोकरीचाच शोध घेणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. घरातील लोक लग्न करण्यासाठी मागे लागले. शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे संशोधनाचे काम सुरू होते. त्यामुळे २०१८ संपताच काही तरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रमंडळींसह मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतुन काही पैसे वाचवून ५ लाख रूपये जमा केले. गावाकडील नातेवाईक वैजनाथ पवार यांना सोबत घेत माजलगाव येथे यशराज मल्टीसर्व्हिसेस दुकान टाकले. यात पॅन कार्ड काढून देणे, नॉनक्रिमिलेअर, रहिवाशी, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रेल्वे, विमान, बसचे तिकिट बुकिंग, तिरुपती बालाजी दर्शन पास काढून देणे. याशिवाय शेतकऱ्यांना सातबारा काढून देणे, पिक विमा अर्ज भरून देणे, बँकेतुन पैसे काढणे-भरणे, एमटीएम अशी सेवा सुरु केली.  ग्रामीण भागातील नागरिकांना या सेवा आवश्यक असल्यामुळे काही दिवसात अपेक्षित गर्दी होऊ लागली.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी नातेवाईकांसह दोघांना १० रूपयांची गुंतवणूक करावी लागली. मात्र दोन महिन्याच्या आतच त्याचा परतावा सर्व खर्च जाऊन ५० ते ६० हजार  रूपये महिना मिळू लागला आहे. सतीश चार दिवस पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करण्यासाठी औरंगाबादेत असतो. त्याचवेळी नातेवाईक दुकान सांभाळतो. तसेच गावातील दोन युवकांनाही त्याने रोजगार उपलब्ध करून देत दुकानावर कामाला ठेवले आहे. या व्यवसायात आणखी गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नसल्यामुळे वाढ करता येत नाही.  तरीही येत्या काही दिवसात मोठी भरारी घेता येईल, असेही सतीश सांगतो.

व्यवसायाची लाज वाटत नाही प्राध्यापक होण्यासाठी ४५ ते ५० लाख रूपये द्यावे लागतील. त्याशिवाय नोकरी मिळणार नाही. प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आता परिस्थिती पाहून प्राध्यापक होऊ वाटेना गेले आहे. एवढे पैसे देऊन तर कधीच प्राध्यपक व्हायचे नाही. त्यामुळे व्यवसाय सुरु केला. एवढे शिक्षण घेऊनही दुकानावर बसताना काही लाज वाटत नाही. उलट स्वकृत्वातुन सुरू केलेल्या व्यवसायाचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया ही सतीश याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

पहा व्हिडिओ

टॅग्स :Studentविद्यार्थीbusinessव्यवसायDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMONEYपैसाProfessorप्राध्यापक