शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मराठवाड्याला मिळणार अधिकचे पाणी; निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 18:51 IST

गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे.

औरंगाबाद : निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील भागास अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, हे सगळे प्रकरण तपासण्याची गरज असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. यापूर्वी आंध्र प्रदेशशी झालेल्या विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहे, असे गृहीत धरून चर्चा केली जात होती. अलीकडेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. जलविज्ञान कार्यालयाच्या मुख्य अभियंत्यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यानुसार अगोदरचे ११७.८७ टीएमसी आणि अधिकचे ४४.५४ टीएमसी असे मिळून १६७.४६ टीएमसी पाणी वापरण्यास मंजुरी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांनी घेतला.

या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूस, अरुणावती व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार ऊर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगामधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणे शक्य होणार आहे.

हे प्रकरण तपासण्याची गरजऑक्टाेबर महिन्यात मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदामंत्री पाटील यांनी मंजुरी दिल्यानंतर निम्न पैनंगगा प्रकल्पातून पाणी वापरास मंजुरी दिली आहे. या दोन निर्णयामुळे पाण्याविना रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लागतील असा दावा करण्यात येत आहे, तर दुसरीकडे जलतज्ज्ञांच्या मते हे दोन्ही निर्णय मराठवाड्याच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारे आहेत. हा प्रकल्प यवतमाळच्या जिवावर, आंध्र आणि विदर्भात आहे. ते पाणी मराठवाड्याला कसे आणणार हे कळण्यास मार्ग नाही. आंध्र प्रदेश आणि विदर्भात प्रकल्पातून पाट जाणार आहे. मराठवाड्याला काय लाभ होईल, त्यामुळे हा दावा फोल वाटतो आहे. तेथील जुना प्रकल्प रद्द होणार नाही, त्याचे आंध्र प्रदेशने पैसे भरलेले आहेत. त्यामुळे हे सगळे प्रकरण तपासण्याची गरज आहे, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणी