शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात मराठवाड्याचे चित्र बदलेल; मुख्य अभियंता सुरकुटवार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:36 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला.

ठळक मुद्देमुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत मराठवाड्यात केलेल्या कामकाजाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यामराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ३० एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होत असून, सुट्यांमुळे त्यांच्या प्रशासकीय सेवेचा २७ एप्रिल हाच शेवटचा दिवस ठरला. अलीकडच्या काही वर्षांत सी.डी.फकीर यांच्यानंतर मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त होणारे सुरकुटवार हे दुसरे अभियंते आहेत. 

दोन वर्षांत त्यांनी विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात केलेल्या कामकाजाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, येथे रुजू झालो तेव्हा परिस्थिती वेगळी होती. १ हजार कोटींहून अधिक रुपयांची कामे या दोन वर्षांत सुरू केली. गोदावरी व पूर्णा नदीवरील ८ ते १० पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. अंबाजोगाई येथील हॉस्टेल, बाह्यरुग्णालय, हिंगोली, बीड येथील कोर्ट, कळमनुरी हॉस्पिटल इमारतीचे काम पूर्ण झाले. २०० कोटींच्या इमारत बांधणीची निविदा प्रक्रिया पूर्ण होत असून, महिनाभरात ती कामे सुरू होतील. १ हजार कि़मी.चे नवीन रस्ते या दोन वर्षांत विभागात झाले आहेत. आगामी काळात अ‍ॅन्युटीमधून मोठ्या प्रमाणात रस्ते होतील.खड्डेमुक्त मराठवाडा यासाठी खूप परिश्रम घेतल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते आणि इमारतींसह २ हजार कोटींच्या आसपासचा निधी शासनाने विभागामध्ये दिला आहे. शिल्लक कामांची देणी ५० टक्क्यांवर आणल्यामुळे मोठा भार हलका झाला आहे. याच शिस्तीत पुढे काम चालले, तर विभागाचा फायदा होईल. 

चांगले अधिकारी आल्यास गती पैठण रोडची डागडुजी, लिंकरोडपर्यंत काँक्रिटीकरण, परळीतील रस्ते, उदगीर, परतूर येथील रेल्वे उड्डाणपूल, फुलंब्रीतील पुलांचे बांधकाम, नांदेड जिल्ह्यातील माहूर बायपास, भोकरमधील सिमेंट रस्ते, जालना ते भोकरदन रस्ता, ही कामे गतीने केली. शासनाने विभागात मोठ्या  प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन वर्षांत विभागातील इमारती व रस्त्यांचे चित्र बदललेले असेल. चांगले अधिकारी, अभियंते या विभागात आल्यास कामांना मोठी गती मिळेल. येत्या काळात शासन रिक्त पदांची भरती करील, फे्रश कर्मचारी विभागाला मिळतील. त्यामुळे आणखी गुणवत्तापूर्ण कामे होतील, अशी अपेक्षा मावळते मुख्य अभियंता सुरकुटवार यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग