शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

संशोधनात मराठवाड्याचा डंका! जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये सहा जणांचा समावेश

By राम शिनगारे | Updated: September 1, 2023 12:29 IST

स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून २ टक्के शास्त्रज्ञांची यादी जाहीर; भास्कर साठेंची हॅटट्रिक, तर संगशेट्टीचा चौकार

छत्रपती संभाजीनगर : अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाने २०२३ या वर्षातील जगभरातील २ टक्के प्रभावशाली शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली आहे. त्यात एकूण २ लाख शास्त्रज्ञ असून, भारतातील ३५०० जणांचा समावेश झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील पाच तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील एका प्राध्यापकानेही बाजी मारली आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना १८८५ साली झाली. हे विद्यापीठ मागील काही वर्षांपासून जगभरातील संशोधन करणाऱ्या प्रभावशाली शास्त्रज्ञांची यादी जाहीर करते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे डॉ. भास्कर साठे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली. तसेच भौतिकशास्त्र विभागातील डॉ. के. एम.जाधव (सेवानिवृत्त) आणि डॉ. प्रविणा उगले-पवार यांचाही यादीत समावेश आहे. शहरातील वाय.बी. चव्हाण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील डॉ. जयप्रकाश संगशेट्टी यांचा सलग चौथ्यांदा तर सेवानिवृत्त झालेले शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.के. मौर्य यांचाही यादीत समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरातील पाच जणांशिवाय मराठवाड्यातील नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील डॉ. राजाराम माने यांचाही समावेश आहे. या प्राध्यापकांची निवड संशोधनाचा दर्जा ठरविणारे जगप्रसिद्ध स्कोपस एच इंडेक्स, इम्पॅक्ट फॅक्टर आणि एकूण सायटेशनची (संशोधनाचा वापर) संख्या यावर केली आहे.

देशात 'आयआयसी' तर राज्यात पुणे विद्यापीठ आघाडीवरस्टॅनफर्ड विद्यापीठाच्या यादीत भारतातील बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील (आयआयसी) ११२ जणांचा समावेश आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली ८९, आयआयटी खरगपूर ८३, आयआयटी मुंबई ६३, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर ३८, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १५, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर १०, मुंबई विद्यापीठ ३ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ५, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील २ जणांचा समावेश आहे.

'एडी सायंटिफिक' इंडेक्समध्ये ४२ जण'एडी सायंटिफिक' इंडेक्स हेसुद्धा जगभरातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ आणि विद्यापीठांची रॅकिंग जाहीर करते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४२ प्राध्यापक व विद्यार्थी संशोधकांचा समावेश २०२३ च्या यादीत केला आहे. या ४२ जणांमध्येही स्टॅनफर्ड विद्यापीठातील जाहीर केलेल्या यादीतील सर्वांचा समावेश आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र