औरंगाबाद : मराठवाड्यात २६ मार्चच्या मध्यरात्रीनंतर लातूर, परळी, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. २५ मार्चपासून विभागाचे तापमान वाढून वातावरणात उकाडा जाणवत आहे. रोज रात्री पावसाळ्यासारख्या विजांचा कडकडाट आणि ढग गरजण्याच्या आवाजामुळे जोरदार पाऊस येण्याचे संकेत आहेत. शहरात रविवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने सडा शिंपडला. शनिवारी दिवसभर आणि रात्रीतून औरंगाबाद शहरात ०.२० मि.मी. पावसाची नोंद झाली. भावसिंगपुरा या मंडळात त्या पावसाची नोंद झाली आहे. चिकलठाणा वेधशाळा सूत्रांनी सांगितले, पाऊस झाला; परंतु नोंद घेण्याइतका तो बरसला नाही. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. २८ रोजी विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होईल, अशी शक्यता हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविली.
मराठवाड्यात अवकाळी पावसाच्या सरी
By admin | Updated: March 28, 2016 00:03 IST