शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा अजूनही कोरडाच, मोठ्या धरणांत जेमतेम पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 08:37 IST

जायकवाडी धरणात केवळ ४.३ टक्केच जिवंत साठा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत   

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने पूर्ण होत आहेत. तरी मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला नाही. परिणामी, मोठ्या, मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे.   

मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागाकडेही मुसळधार पावसाने पाठ फिरविल्यामुळे जायकवाडी प्रकल्पात केवळ ४.३ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात २७.६५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आहे.    

तीन प्रकल्प कोरडेमराठवाड्यातील सीना कोळेगाव, मांजरा आणि मांजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.  ७५० लघुप्रकल्प कोरडेगतवर्षी अत्यल्प पावसामुळे सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत.

नाशिकमध्ये १८८ टँकरद्वारे पाणीपुरवठानाशिक : जिल्ह्यातील धरणसाठा केवळ ३३ टक्के असल्याने नाशिकमध्ये जलसंकट उद्भवले आहे. ऐन पावसाळ्यात नाशिकमध्ये १८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर खरिपाच्या पेरण्या होऊनही पाऊस गायब झाल्याने बळीराजाही चिंतेत आहे. सर्वाधिक पाऊस देवळा तालुक्यात १५३ टक्के झाला आहे.  नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, बागलाण, सिन्नर, मालेगाव, येवला आणि नांदगाव या सात तालुक्यांमध्ये एकूण १७४ गावे आणि ५६६ वाड्यांना १८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात सर्वाधिक ३६ टँकर नांदगाव तालुक्यात सुरू आहेत.

इच्छागव्हाणला लागली गळतीनंदुरबार : तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण लघु प्रकल्पाला गळती लागल्याने प्रकल्प फुटण्याची भीती आहे. प्रकल्पात प्रथमच पाणीसाठा झाला आहे. प्रकल्प फुटल्यास पाच गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

जलसाठा किती टक्के?  धरण    आजचा    गतवर्षीची    साठा     स्थितीजायकवाडी    ४.३    २७.६५  निम्न दुधना    ६.४०    २७.३८  येलदरी    ३०.८    ५७.८८  सिद्धेश्वर    ५.६६    ९.८७  पैनगंगा    ४०    ४८.८०  मानार    २७.३६    ३५.६  निम्न तेरणा    २५    २७.६० विष्णूपुरी    ७०    ५३.६१  माजलगाव    ००    १६.२८ मांजरा    ००    २३.२४  सीना कोळेगाव    ००    उणे १४ 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊस