शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मराठवाडा विकास मंडळ सदस्यांच्या बैठकीला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:16 IST

मराठवाडा विकास मंडळाची ४ एप्रिल रोजी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाची ४ एप्रिल रोजी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बैठकीसाठी मंडळावरील तज्ज्ञ सदस्यांनी सिंचन, भौगोलिक, शिक्षण, वैद्यकीय, रोजगार अनुशेषाबाबत तयार केलेल्या टिपणीसाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. चार वर्षांपासून विकास मंडळाला पूर्णवेळ अशासकीय अध्यक्ष देण्यात आलेले नाहीत. त्यातच अनुशेष व अनुदान मिळत नसल्यामुळे ते मंडळ कागदोपत्रीच सुरू आहे. त्याचा या विभागाला सध्या तरी काहीही उपयोग होत नसल्याचे दिसते आहे.फेबु्रवारी महिन्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा विकास मंडळ सदस्यांना वेळ देऊनही बैठक घेतली नाही. त्यावेळी तयार केलेला १ हजार कोटी रुपयांचा मराठवाडा अनुशेषाचा प्रश्न शासनापर्यंत गेलाच नाही. त्यानंतर राज्यपालांनी ४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व मंडळांच्या अनुशेषावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे नियोजन केले; परंतु ती बैठकही लांबणीवर पडल्यामुळे मराठवाड्याच्या अनुशेष दूर होण्यासाठी केव्हा मुहूर्त लागणार, असा प्रश्न आहे.निधी कधी मिळणार?राज्यातील तिन्ही मंडळांसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात असे. १९९५-९६ पासून २५ कोटी रुपये मराठवाडा विकास मंडळाला मिळत असत. २०११ पासून हा विशेष निधी बंद झाला. २०१४-१५ साली १४ कोटी थकीत निधीपैकी मिळाले. उर्वरित ८६ कोटी अजून दिलेले नाहीत. मंडळ २०१५ पासून या निधीसाठी पाठपुरावा करीत आहे. निधी देण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशींचा विचार होत नसल्याचे मंडळाचे मत आहे. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार