शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा विकास मंडळ सहसंचालकपद रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:02 IST

मराठवाडा विकास मंडळातील सहसंचालकपदी डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली; परंतु त्यांनी पदाचा पदभारच न घेतल्यामुळे सहसंचालकपदाचे काम विभागीय उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनाच पाहावे लागत आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळातील सहसंचालकपदी डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली; परंतु त्यांनी पदाचा पदभारच न घेतल्यामुळे सहसंचालकपदाचे काम विभागीय उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनाच पाहावे लागत आहे. मुगळीकर यांची मनपातून १६ मार्च रोजी बदली झाली. बदली होऊन १८ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु ते अजूनही रजेवर असल्याने मंडळाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांकडून करून घेतले जात आहे.

मराठवाडा विकास मंडळात सध्या फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम शिल्लक राहिले आहे. निधी नाही, अधिकार कागदावरच असल्यामुळे मुगळीकरांना त्या पदावर काम करण्याची इच्छा नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी अद्यापपर्यंत पदभार घेतला नसल्याचे दिसते.  या महिनाअखेरीस किंवा पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याचे संकेत आहेत. त्या बदल्यांमध्ये मुगळीकर यांची मर्जीतील पदावर वर्णी लागण्याचे संकेत आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालयातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी या पदांवरही शासन अधिकारी नियुक्त करण्याचे अपेक्षित आहे. 

मंडळाची धुरा प्रभारींवर मंडळावर प्रभारी अध्यक्षांची निवड करण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. अर्थतज्ज्ञ आर. पी. कुरुलकर यांच्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, संजीव जायस्वाल, उमाकांत दांगट यांनी अध्यक्षपद सांभाळले. सध्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आहेत. मंडळाच्या अप्पर आयुक्त आणि सदस्य सचिवपदाचा कारभारही प्रभारींकडेच देण्यात आला आहे. २०१२ नंतर मंडळाला पूर्णवेळ सदस्य सचिव मिळू शकला नाही. मंडळात मोजकेच कर्मचारी आहेत; परंतु त्यांच्याकडे कामच नाही.  सहसंचालक जयप्रकाश महारणवर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या पदावर प्रभारी अधिकारीच आहेत. प्रशासकीय, संशोधन, सहायक लेखाधिकारी, लघुलेखक, लिपिक आणि शिपाई पदे रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, लाईट बिल खर्च लाखो रुपये आहे.

मुगळीकर म्हणाले...१६ मार्च रोजी मनपातून बदली झाल्यानंतर विकास मंडळ सहसंचालकपदाचा पदभार का घेतला नाही, याबाबत डी.एम. मुगळीकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, येत्या दोन-चार दिवसांत पदभार घेईल. सध्या रजेवर आहे. त्यामुळे पदभार घेतला नाही.  

टॅग्स :Marathwadaमराठवाडाcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना