शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात रबी पेरणीत बीड अव्वल, तर औरंगाबाद पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 13:01 IST

६ लाख ६४ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ६६ हजार ८५० हेक्टरवर रबी पेरणी पूर्ण

ठळक मुद्देविभागात ७० टक्के पेरण्या पूर्णऔरंगाबादमध्ये गहू, हरभऱ्याची पेरणी अधिक

औरंगाबाद : बीड, जालना, औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यांत ७० टक्के रबी पीकपेरणी पूर्ण झाली आहे. त्यात बीड जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी झाली असून, जालना जिल्ह्यात ६३ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ४२ टक्के पेरणी झाल्याची नोंद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात झाली आहे. 

६ लाख ६४ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ६६ हजार ८५० हेक्टरवर रबी तृणधान्य, कडधान्ये, गळीत धान्याची ७० टक्के लागवड पूर्ण झाली असून, पेरणीत बीड जिल्हा अव्वल असून, औरंगाबाद पिछाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.जालना जिल्ह्यात रबी ज्वारी ५२ हजार १९४, गहू १८ हजार ३५३, मका ५ हजार ३१२, हरभरा ३३ हजार २५२ हेक्टरवर पेरणी झाली. बीड जिल्ह्यात रबी ज्वारी १ लाख ४३ हजार ७१७, गहू १९ हजार ५२८, मका २ हजार २८२, हरभरा १ लाख ४ हजार ७६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यात रबी ज्वारी २३ हजार ३११, गहू ३० हजार २३, मका १३ हजार ९५१, हरभरा १९ हजार ५६८ हेक्टरवर लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी २ लाख ८ हजारपैकी ८७ हजार २६३ हेक्टर, जालना जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३६८ पैकी १ लाख ९ हजार ७७१ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात २ लाख ८१ हजार ४८० हेक्टरपैकी २ लाख ६९ हजार ८१६ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली. बीडमध्ये अनुक्रमे रबी ज्वारी, हरभरा, गव्हाच्या क्षेत्रावर, जालना जिल्ह्यातही बीड सारखेच प्रमाण असून, औरंगाबादमध्ये गहू, हरभऱ्याची पेरणी अधिक असून, मक्याचे क्षेत्र सरासरीच्या दीडपट वाढले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा