शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Video : मराठा आरक्षणासाठी मन्याड प्रकल्पावर आंदोलन; आंदोलकांनी दिला जलसमाधी इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:28 IST

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

वैजापुर (औरंगाबाद ) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी आल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, दुपारी चार वाजेपर्यंत वाट पाहू नसता जे घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 

कायगाव टोका येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त मन्याड प्रकल्पावर तैनात केला आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.संदिपान सानप,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार सुमन मोरे,वैजापुरचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी,विरगावचे पि.आय अतुल येरमे,शिऊरचे पि.आय तांदळे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे जवान, तटरक्षक जवान, बोट, रूग्णवाहिका आदी यंत्रणा मन्याड प्रकल्पावर सज्ज ठेवण्यात आले आहे. 

यावेळी आंदोलकानी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी चिकटगाव येथील देविदास निकम यांच्यासह तिन तरुणाने प्रकल्पात उडी मारली होती त्याला सुरक्षारक्षकांनी सुरक्षित बाहेर काढले. दुपारी चार वाजेपर्यन्त जिल्हाधिकारी उदय चौधरी येथे येवून निवेदन स्वीकारले नाही तर जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अजय साळुंके, चंद्रशेखर साळुंके, संतोष निकम यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे अभय पाटील चिकटगावकर,भागिनाथ मगर,राजेंद्र मगर,संतोष सूर्यवंशी पोहचले असून त्यांनी आंदोलकांशी चर्चा सुरु केली आहे. आंदोलनस्थळी ६ ते ७ हजार नागरिकांची उपस्थिती आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादagitationआंदोलन