शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

Maratha Reservation: ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’च्या डॉ. प्रवीण काबरांविरूद्ध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 08:47 IST

Maratha Reservation: डॉ. प्रवीण काबरा यांना काळे फासण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काबरा हॉस्पिटल येथे हे आंदोलन झाले.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल करणाऱ्या ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ चळवळीला फंडिंग केल्याचा आरोप करीत डॉ. प्रवीण काबरा यांना काळे फासण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काबरा हॉस्पिटल येथे हे आंदोलन झाले.सुनील कोटकर, रवी कळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय सावंत, भरत कदम, संतोष गायकवाड, गणेश उगले पाटील, निलेश ढवळे, पंढरीनाथ गोडसे, दत्तात्रेय घारे अशी आंदोलकांची नावे आहेत.याविषयी सुनील कोटकर आणि रवींद्र काळे यांनी सांगितले की, मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत आरक्षण मिळाल्यावर ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ ही चळवळ उभी राहिली. या चळवळीतर्फे नागपूर खंडपीठ येथे मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल केली. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरण सुनावणीला होते, तेव्हा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांमध्ये ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ची एक याचिका होती. त्यांनी लाखो रुपये खर्चून मराठा आरक्षणाला विरोध केला. ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ला आर्थिक रसद पुरविणाऱ्या लोकांच्या यादीत औरंगाबाद शहरातील काबरा हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण काबरा यांचा यात समावेश आहे. यामुळे शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे त्यांना जाब विचारून काळे फासणार होतो. त्यांच्या हॉस्पिटलजवळ जाताच पोलिसांनी आम्हाला पकडले, असे त्यांनी सांगितले. 

पोलिसांनी गुन्हा नोंदविलामहेशनगर येथील डॉ. काबरा यांच्या रुग्णालयात मराठा क्रांती मोर्चाचे लोक जाणार असल्याचे कळताच पोलिसांनी आंदोलनापूर्वीच बंदोबस्त लावला. कार्यकर्ते येताच पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलकांवर जमावबंदीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या