शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : 'मराठा क्रांती मोर्चा नावाने राजकीय पक्ष नको, अन्यथा रोखठोक उत्तर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 21:59 IST

Maratha Reservation : कोपर्डीतील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पीडितेला न्याय मिळाला आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मुख्य मागणीसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे,

औरंगाबाद : कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्यारुपाने मराठा समाजाचे देशातील पहिले सामाजिक आंदोलन सुरू झाले. केवळ मराठा समाजाच्या आस्था क्रांती मोर्चाशी जुळलेल्या आहेत, असे असताना कुणी वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय पक्ष काढत असेल तर त्याला मराठा क्रांती मोर्चा विरोध करेल, असा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तसेच तसा प्रयत्न झाल्यास रोखठोक उत्तर मिळेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कोपर्डीतील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पीडितेला न्याय मिळाला आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मुख्य मागणीसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतीमालाला भाव मिळावा, आदी मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मूकमोर्चा औरंगाबादेत झाला. त्यानंतर राज्यात आणि संपूर्ण देशात 58 मूकमोर्च निघाले. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जलदगती न्यायालयात कोपर्डीचा खटला चालविण्यात आला. न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र, अद्यापही आरोपींना शिक्षा झालेली नाही.  अन्यायाविरोधात लढा देणारी ही एक सामाजिक चळवळ निर्माण झालेली आहे. मराठा क्रांती मोर्चाशी संपूर्ण मराठा समाजाच्या आस्था जुळलेल्या आहेत, असे असताना काही जण राजकीय स्वार्थासाठी मराठा क्रांती मोर्चा अथवा सकल मराठा या नावाने राजकीय पक्ष काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे क्रांती मोर्चा अथवा सकल मराठा नावाने कुणीही संघटना बांधणी करू शकत नाही. कोणी जर तसा प्रयत्न केल्यास क्रांती मोर्चा संबंधितांना रोखठोक उत्तर देतील, असा ठराव एकमताने या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विजय काकडे, रमेश गायकवाड, प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, अंकत चव्हाण, सुनी कोटकर, शिवाजी जगताप, रामेश्वर राजगुरे, सुवर्णा मोहिते पाटील, प्रदीप हारदे, प्रशांत शेळके, बाळासाहेब औताडे, संदीप सपकाळ, योगेश औताडे, विलास औताडे, रेखा वाहटुळे,सतीश वेताळ, अमोल साळुंके, सुकन्या भोसले, नितीन कदम, गणेश जाधव, दादासाहेब बोरसे आणि सचिन मिसाळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण