शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 12:41 IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे भेटणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार.

ठळक मुद्देमराठा समाजाच्या प्रश्न शासनदरबारी पोहचवण्यासाठी ५८ मोर्चे काढून झाले. आता रस्त्यावर आंदोलनाची गरज नाही. कोविडच्या कालावधीत आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात कशासाठी घालायचा असा सवाल त्यांनी उपस्थित

औरंगाबाद : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने समाजासाठी काय करता येईल यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. याकरिता दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल नांदेड आणि जालना जिल्ह्याचा दौरा करुन ते रात्री औरंगाबाद शहरात मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मराठा क्रांती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याशी  चर्चा केली. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्न शासनदरबारी पोहचवण्यासाठी ५८ मोर्चे काढून झाले. आता रस्त्यावर आंदोलनाची गरज नाही. कोविडच्या कालावधीत आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात कशासाठी घालायचा असा सवाल त्यांनी उपस्थित करुन आमदार विनायक मेटे यांनी ५ जून रोजी आयोजित केलेल्या मोर्चा चुकीचा असल्याचे एकप्रकारे संकेत दिले.  

तसेच मराठा आरक्षणापेक्षाही सारथी संस्था महत्वाची आहे. मात्र, ज्या व्यक्तीना मराठा समाजाबद्दल आस्था नाही अशा लोकांच्या हातात सारथीचे सुत्र आहेत. सारथीमध्ये मराठा समाजाचा व्यक्ती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने कोणत्याही परिस्थितीत  मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले उचलावीत .यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आपसांततील हेवेदावे बाजूला ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. याकरिता दोन दिवसात शरद पवार , देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर २८ मे रोजी त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAurangabadऔरंगाबाद