शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण आंदोलन: छत्रपती संभाजीनगरहून बीड, सोलापूर, तूळजापूर बससेवा ठप्प

By संतोष हिरेमठ | Updated: October 29, 2023 15:06 IST

पैठण फाटा ते अंतरवाली सराटी या मार्गावरील ‘कँडल मार्च’मुळे शनिवारी सायंकाळी सिडको बसस्थानकाची बीड मार्गावरील बससेवा सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाने  सिडको बसस्थानकातून धावणाऱ्या बीड, सोलापूर, तूळजापूर, लातूरची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

 पैठण फाटा ते अंतरवाली सराटी या मार्गावरील ‘कँडल मार्च’मुळे शनिवारी सायंकाळी सिडको बसस्थानकाची बीड मार्गावरील बससेवा सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात आली होती.  यामुळे बीड जाणाऱ्या प्रवाशांची सिडको बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती. बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना ताटकळावे लागले. बस येत नसल्याचे पाहून अनेकांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास केला. सलग दुसऱ्या दिवशी, रविवारीही सिडको बसस्थानकातून सुटणाऱ्या बीड, सोलापूर, तूळजापूर, लातूरच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या.

मराठा आरक्षण मागणीसाठी व मनोज जरांगे - पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठींबा म्हणून गेल्या ४ दिवसांपासून मराठा समाज बांधव धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले आहेत. राज्य सरकारने समाजाची फसवणुक करत हे शासन जरांगे - पाटील यांच्या जिवावर उटले आहे असे म्हणत याचा निषेध करत एस टी बस वरील शासकिय जाहिरातीवर असलेल्या पंतप्रधान , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले .आरक्षण न दिल्यास जरांगे- पाटील यांच्या सल्ल्याने आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

बीडमध्येही बस सेवा बंद

बीड जिल्ह्यामध्ये रात्री बसेस पेटवून दिल्याच्या घटना घडल्याने खबरदारी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व एसटी मंडळाच्या वित्तीय नुकसानीमुळे जिल्ह्यातील बस सेवा आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. बस सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसेस आगारामध्ये उभ्या करण्यात आल्या असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलना दरम्यान बस वर दगडफेक होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बससेवा बंद असल्याने प्रवासी खाजगी वाहनांचा आधार घेताना दिसत आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणstate transportएसटी