शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीला धडकणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:16 IST

Maratha Kranti Morcha : ९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यासाठी समन्वयकांचे एकमत १०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर ठरत नाही

औरंगाबाद: घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा लोकसभा हिवाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीला धडकणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

चव्हाण म्हणाले की , मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. तेव्हापासून समाजाचे तरुण हवालदिल झाले आहे. नोकरी आणि शिक्षणाचे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी समाज पुन्हा संघटित झाला आहे. मराठा समाजाला केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी तात्काळ पावले उचलावे याकरिता मराठा क्रांती मोर्चा दिल्ली येथे धडकणार आहे. या मोर्चाला जाण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीकरीता रेल्वे गाड्या बुक करणार आहेत. या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थगिती पूर्वीच्या नियुक्त्या द्या ९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. मराठा विद्यार्थ्याना ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षण सरसकट न देता ऐच्छिक करावे, राज्य सरकारने मॅनेजमेन्ट कोटा म्हणून मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा आणि त्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे. यावेळी अभिजीत देशमुख, सुरेश वाकडे, मनोज गायके,सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, मनिषा मराठे आदी उपस्थित होते. 

१०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर ठरत नाहीकेंद्रीय मागासवर्गीय आयोगाने १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याच्या इतर मागासवर्गीयासाठी आरक्षण देण्याच्या अधिकाराला धक्का लागत नाही. राज्य सरकार स्वतःच्या अधिकारांत कोणत्याही जातीला आरक्षण देऊ शकते. यासाठी त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्रीय मागास आयोगाकडे शिफारसीसह पत्र पाठवून त्यांचे स्पष्टीकरण घ्यावे असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण