शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चा : मशाल रॅलीतील आंदोलकांनी ठिय्या देताच पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:44 IST

Maratha Reservation मशाल रॅली येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता क्रांतिचौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

ठळक मुद्देसाष्ट पिंपळगाव ते क्रांतिचौक मशाल रॅलीचा समारोपपोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले आणि क्रांतिचौक ठाण्यात नेले.

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे, मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी साष्ट पिंपळगाव (ता.अंबड ) येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या मशाल रॅलीचा समारोप क्रांतीचौकात झाला. यानंतर आंदोलकानी ठिय्या देण्यास सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

साष्ट पिंपळगाव येथून आलेल्या आंदोलकांचे काही वाहन पोलिसांनी केंब्रिज चौकात अडविल्याचा दावा आंदोलकांनी केला. शहरात चार वाहनांमधून मशाल घेऊन आलेल्या २० आंदोलकांनी क्रांतिचौकात रॅलीचा समारोप केला आणि ठिय्या देण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक जी. एच. दराडे यांनी ठिय्या आंदोलनाला परवानगी नसल्याचे यावेळी नमूद केले. यामुळे आंदोलन करू नका, असे सांगितले. मात्र त्यांचे न ऐकता घोषणा सुरूच ठेवल्याने पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले आणि क्रांतिचौक ठाण्यात नेले. या आंदोलनात मनीषा मराठे, दिव्या पाटील, सुवर्णा तुपे, कावेरी पावसे, मंगल पंडित, अनिता भोकरे, संजय सावंत, अमोल साळुंके, राहुल भोसले, सुधाकर शिंदे, प्रदीप नवले, गणेश उगले आदींनी सहभाग घेतला.

२० आंदोलक ६० पोलीसमशाल रॅली येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता क्रांतिचौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र प्रत्यक्षात रॅलीसह केवळ १८ ते २० आंदोलक आले. मात्र तेथे पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, विशेष शाखेचे निरीक्षक कटाणे यांच्यासह सात पोलीस अधिकारी, दोन महिला अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचारी.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद