शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काही आरक्षण अभ्यासक अन् सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: October 12, 2023 18:54 IST

४० दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. असे असताना राज्यसरकारने आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: ९ ऑगस्ट २०१६ रोजी मराठा समाजाचा पहिला मोर्चा शहरातून काढण्यात आला तेव्हापासून मराठा आरक्षण ही मागणी समाजाने लावून धरली.यानंतर राज्यसरकारने दिलेले एसईबीसी आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. आता मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणारे कथित अभ्यासक आणि राज्यसरकारकडून समाजाची दिशाभूल केली असल्याचा आरोप क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

काळे पाटील म्हणाले की, मराठा क्रांती मूक मोर्चाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात झाली. यानंतर राज्यात तब्बल ५८ मोर्चे निघाले. शिवाय मराठा बांधवांनीही आत्मबलिदान दिले. रस्त्यावरील लढाईतून मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण मिळाले. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर रद्द झाले. तत्कालीन सरकारने योग्य बाजू न मांडल्याने हे आरक्षण रद्द झाले. तेव्हापासून मराठा समाज वाऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे,यासाठी रस्त्यावरील लढाई लढत आहेत. त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी जाहिरसभेचे आयोजनही केले आहे. आम्ही मराठा म्हणून त्या सभेला जाणार आहोत. 

जरांगे यांना ४० दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. असे असताना राज्यसरकारने आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. शिवाय काही मराठा अभ्यासकही न्यायालयातूनच आरक्षण मिळेल असे सांगत आहेत. यावरून हे अभ्यासक आणि सरकार समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काळे पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांचे आंदालन सुरू झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी  मराठा आरक्षण उपसमिती बैठक घेतल्याचा आरोप काळे यांनी केला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण