शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

२८ गावांच्या ‘झालर’चे नकाशे अडकले, काम करणारी एजन्सी नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:45 IST

नगरविकास खाते आणि सिडकोच्या बेफिकिरीमुळे २८ गावांसाठी तयार केलेले नकाशे सामान्य नागरिकांसाठी सात महिन्यांपासून उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.

ठळक मुद्दे ५० लाख रुपयांचे बिल एजन्सीला कुणी द्यावे असा नगरविकास खाते आणि सिडकोमध्ये वाद. या वादात झालर क्षेत्र विकास आराखड्याचे अंतिम नकाशे अडकले आहेत. 

- विकास राऊत 

औरंगाबाद : नगरविकास खाते आणि सिडकोच्या बेफिकिरीमुळे २८ गावांसाठी तयार केलेले नकाशे सामान्य नागरिकांसाठी सात महिन्यांपासून उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. ज्या एजन्सीने नकाशे तयार केले आहेत त्या एजन्सीकडेच नकाशे पडून आहेत. ५० लाख रुपयांचे बिल एजन्सीला कुणी द्यावे, या वादात झालर क्षेत्र विकास आराखड्याचे अंतिम नकाशे अडकले आहेत. 

त्या नकाशांच्या आधारे ज्यांना आरक्षणाबाबत आक्षेप घ्यायचा आहे, त्यांना आक्षेप दाखल करण्यास विलंब होतो आहे. नकाशे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची, भूधारकांची परवड होत आहे. तर सातारा-देवळाई वगळून उरलेल्या २६ गावांतील शेतकरी, विकासकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 

सिडकोतील सूत्रांनी सांगितले, सध्या बिल अदा करण्यावरून नकाशांचे प्रकरण रखडले आहे. झालर क्षेत्र विकास आराखड्याच्या नकाशांची मूळ प्रत टाऊन प्लॅनिंगकडून सिडकोला मिळालेली नाही. ज्या एजन्सीने ते नकाशे बनविले, त्या एजन्सीला कामाचा मोबदला दिलेला नाही. २८ गावांतील सर्व्हे आणि नकाशे पुण्यातील मोनार्च या एजन्सीने तयार केले आहेत. सिडकोचा आणि त्या एजन्सीचा काहीही संबंध नाही. तरीही सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नगरविकास खात्याला पत्र दिले आहे.

एजन्सीने सुमारे ५० लाख रुपयांसाठी नकाशांच्या मूळ प्रती दाबून ठेवल्या आहेत. एजन्सीची ५० लाख रुपयांची रक्कम मंत्रालयात जमा करण्यासाठी सिडकोने पत्र दिले आहे. सिडकोसोबत त्या संस्थेचा कुठलाही करार नाही. त्यामुळे सिडको ५० लाख रुपये कुठून देणार, असा प्रश्न आहे. तसेच टाऊन प्लॅनिंगने त्या एजन्सीला नियुक्ती कशी दिली, याचे कोणतेही दस्तवेज उपलब्ध नाहीत. त्यामुळे मंत्रालयात रक्कम जमा करून सिडको मूळ प्रत ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. 

१० वर्षांचा नियोजनाचा प्रवास३० नोव्हेंबर २००८ रोजी सिडकोची २८ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली. नोव्हेबर २०१८ मध्ये दहा वर्षे पूर्ण होतील. अजूनही झालर क्षेत्र विकास आराखड्यातून नेमके काय हाती लागले हे समजण्यास मार्ग नाही. शेतकºयांच्या जमिनीवर चुकीचे आरक्षण टाकल्यामुळे दोन वेळा प्लॅन रद्द करण्यात आला. आक्षेप व हरकतीनंतर सुधारित प्लॅन तयार करण्यात आला. त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु आज अंतिम नकाशे सिडकोने प्रकाशित केलेले नाहीत. 

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी