औरंगाबाद : बचत गटाचे सदस्य बना, मोठे कर्ज देते, असे सांगून गारखेडा परिसरातील काबरानगरमधील एका दाम्पत्याने अनेक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातला. वैशाली ज्ञानेश्वर राऊत व ज्ञानेश्वर राऊत (रा. काबरानगर) अशी आरोपींची नावे आहेत. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, राऊत दाम्पत्याने २०११ मध्ये एक बचत गट स्थापन केला. परिसरातील अनेक महिलांनी गुंतवणूक केली. मात्र कर्ज मिळाले नाही. शेवटी अफसानाबी शेख अफसर व इतर पाच महिलांनी काल राऊत दाम्पत्याचे घर गाठले आणि पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा दाम्पत्याने या महिलांना शिवीगाळ करीत धमकावून हुसकावून लावले. शेवटी महिलांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून या दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बचत गटाच्या नावाखाली अनेक महिलांना गंडविले
By admin | Updated: August 31, 2014 00:41 IST