शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

शनिवार ठरला अपघातवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:09 IST

सप्टेंबर महिन्यातील आजचा तिसरा शनिवार औरंगाबादकरांसाठी अपघातवार ठरला. दिवसभरात झालेल्या पाच अपघातांत ५ जणांचे बळी गेले आणि ८ जण जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सप्टेंबर महिन्यातील आजचा तिसरा शनिवार औरंगाबादकरांसाठी अपघातवार ठरला. दिवसभरात झालेल्या पाच अपघातांत ५ जणांचे बळी गेले आणि ८ जण जखमी झाले. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा ते के म्ब्रिज शाळा चौक परिसरात लहान-मोठे दोन अपघात झाले. जीपने चिरडल्याने चार जण ठार आणि दोन जखमी झाले, तर भरधाव कार दुचाकीस्वारांना उडवून रस्त्याशेजारी उलटल्याने दोन जण जखमी झाले. बीड बायपासवरील नाईक चौकात दुपारी कंटेनर, ट्रक आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. या घटनेत आयशरचालक आणि क्लीनर जखमी झाले. पंढरपूरमध्ये कार कंटेनरवर आदळून एक ठार व दोन जण जखमी झाले. तर सायंकाळी छावणी उड्डाणपुलावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे उड्डाणपुलावरून ट्रक मागे गेल्याने मागून येणारी सात वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना घडली.औरंगाबाद-नगर रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून, शनिवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कंटेनर व कारच्या अपघातात एक शिक्षक ठार झाला असून, कारमधील पिता-पुत्र जखमी झाले.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले की, गिरीश प्रकाश गायकवाड (२७, रा.कडलास, ता.सांगोला जि.सोलापूर) व राहुल अरविंद महामुनी (३०, रा.महूद, ता.सांगोला) हे दोघे सोलापूर जिल्ह्यातील एका संस्थेत शिक्षक आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांना शाळेने काढून टाकले. याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यासंदर्भात औरंगाबादेतील एका वकिलांशी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी हे तिघे सोलापूरहून औरंगाबादकडे निघाले होते.कंटेनरला धडकलेगिरीश गायकवाड कार चालवीत होते. त्यांच्या डाव्या बाजूला राहुल महामुनी व पाठीमागे वडील प्रकाश गायकवाड बसले होते. शनिवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास पंढरपूरजवळील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर कंटनेरला पाठीमागून ही कार धडकली. या अपघातात राहुल महामुनी यांचा जागीच मृत्यू झाला. चालक गिरीश व प्रकाश गायकवाड हे दोघे जखमी झाले.औरंगाबाद : जालना रोडवरील साई मंदिराजवळ भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार चार-पाच पलट्या मारत घटनास्थळापासून पाचशे फुटावर जाऊन पडली.तान्हाजी उत्तम मुंढे (३०), अजय भोसले हे दोघे (एमएच २० बीयू ९३८०) या दुचाकीवरून टाकळी शिंपीकडे जात होते. भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच २० डीजे २४३७) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मुंढे व भोसले जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, चिकलठाणा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण साळवे करीत आहेत.औरंगाबाद : बीड बायपासवर दुपारी ट्रेलरवर ट्रक धडकला. ट्रक एका दुचाकीचा चुराडा करीत संरक्षक भिंतीवर आदळला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले.बीड बायपासवरील नाईकनगरच्या चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास (एमएच २० बीटी ४४२०) या ट्रकच्या दुरुस्तीनंतर सहज ट्रायल मारत असताना नागपूरहून मुंबईकडे जाणारा ट्रक ट्रेलर (एमएच ०६ बीडी १०३९)वर जोरदार धडकला. या अपघातात ट्रकचालकाचा ताबा सुटून तो सरळ रोडच्या खाली जाऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दुचाकी (एमएच २०सीझेड ३६६१)ला फरपटत नेत समोरील संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.