शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

"पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 11:54 IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :  गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनही सुरू आहे.  दरम्यान, आता जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले आहे. त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. काही दिवसातच ते शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पार करणार आहेत. मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या मुळ गावी जाणार आहे, त्याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आरक्षाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत आव्हान केले. 

शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी या आरक्षणाला विरोध सुरू केला असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.  पत्रकारांसोबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीचे विरोधक नाही.आम्ही जो चुकला त्याला बोलतो. फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवं. मराठा समाज ५० , ५५ टक्के आहे. आम्ही कोणालाच आव्हान करत नाही. आम्ही आणि आमच्या समाजाला आव्हान करतो, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठ्यांसमोर तुम्ही शांत बसला नाही, मराठ्यांना असंच डिवचत राहिला तर, मला उघड पाण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय जीवनातून मराठा तुम्हाला संपवणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज अनेक दिवसापासून कष्ट करत आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आमची मुल हमालासारख काम करत आहेत. आमची सुद्धा आता मुल मोठं झाली पाहिजेत. त्यामुळे आता शहरापासून ग्रामीण भागातील मराठा समाज चिडला आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठा समाजात आता यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे. हे लोक सत्तेत असून टारगेट करत आहेत. मराठा समाज आता जशास तसे उत्तर देत आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. मी आता सात ते आठ दिवस काही बोलणार नाही. आता आमचं लक्ष २०२४ आहे, सगळी पाडापाडी करणार, असंही पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील नेत्यांना आव्हान

जरांगे पाटील म्हणाले, काही दिवसापूर्वी एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. यावर आता मी सांगतो, ही जी त्यांनी तीन नावे घेतली यांनी क्लिअक भूमिका घेतली पाहिजे. यांनी मराठ्यांना ओबीसीतून मिळावे अशी भूमिका घेतली पाहिजे, असं आव्हानही मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

"तुम्ही त्यांना एकदा भूमिका विचारली तर त्यांनी काही सांगितली नाही, आता तुम्ही सरळ आरक्षण दिले पाहिजे. ते नाही म्हटले म्हणून तुम्ही आमचं वाटोळ करता का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.  भूमिका घ्यायची की नाही हे त्यांनी ठरवले पाहिजे, 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवार