शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात ‘माणिक हॉस्पिटल’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:21 IST

जवाहरनगर पोलीस ठाण्यालगत असलेले माणिक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात आल्यामुळे आग विझविण्याच्या मदतकार्यात अनेक अडथळे आले.

औरंगाबाद : जवाहरनगर पोलीस ठाण्यालगत असलेले माणिक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात आल्यामुळे आग विझविण्याच्या मदतकार्यात अनेक अडथळे आले. पार्किंगच्या जागेत पुरुष जनरल वॉर्ड, कॅन्टीन, भौतिक उपचार, रेडिओलॉजी, आयसीयू, रुग्ण नातेवाईक प्रतीक्षालय, जनरेटर, प्रसाधनगृह बांधल्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

पुरुष जनरल वॉर्ड पार्किंगमध्ये बांधलेला आहे. हॉस्पिटलच्या एकूण बांधकाम परवानगीत त्या जागेचा वापर पार्किंगसाठी नमूद केलेला आहे. तेथे हा वॉर्ड व इतर विभाग बांधले जात असताना महापालिकेच्या यंत्रणेने अक्षम्य दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आहे. तिसºया मजल्यावर एक मजला बांधला असून, त्यावर एका पत्र्याच्या  शेडचे बांधकाम सुरू आहे. त्यालाही बांधकाम परवानगी घेतली आहे की नाही, याबाबत हॉस्पिटलकडून काहीही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. माहिती मिळताच घटनास्थळाकडे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, आ.अतुल सावे, किशनचंद तनवाणी, संजय जोशी, राजेंद्र जंजाळ आदींनी धाव घेतली. अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी आर. के. सुरे, सी. एल. भंडारे, विनायक कदम, हरिभाऊ घुगे, एस. एम. शकील, एल. एम. हुसैन, दिनेश मुुंगसे, छगन सलामबाद, तुषार तौर, प्रसाद शिंदे, रमेश सोनवणे, सुभाष घरत, एस. एम. कुलकर्णी, शेख असलम, मदन पाटील, मयूर कुमावत, रामेश्वर बमणे, रवी हरणे या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

फायर एक्सटिंगशर निकामीमाणिक हॉस्पिटलचे अंतर्गत बांधकाम सुरू असून, इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटलमध्ये आग विझविण्यासाठी असलेली यंत्रणा पूर्णत: निकामी असल्याचे दिसून आले. अंतर्गत नूतनीकरणाच्या कामामुळे सगळी यंत्रणा कोलमडलेली असल्यामुळे अग्निशमन विभागाच्या यंत्रणेवर अधिक भार पडला. 

दैव बलवत्तर म्हणून रुग्ण वाचलेदैव बलवत्तर असल्यामुळे रुग्ण वाचल्याची प्रतिक्रिया हॉस्पिटलमधील कर्मचाºयांनी व्यक्त केली. बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा असल्यामुळे वरच्या मजल्यावर रुग्णांना खिडकी फोडून बाहेर काढावे लागले. इमारतीच्या उजव्या बाजूला असलेल्या मार्गात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतीक्षालय बांधण्यात आले आहे, जे अनधिकृत आहे. कॅन्टीनदेखील अनधिकृत आहे. तेथे रुग्ण नातेवाईक अडकले होते, त्यांना मुख्य  प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. 

पूर्ण चौकशी करणारप्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, या प्रकरणात पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. हॉस्पिटलने पार्किंगच्या जागेत अनेक वॉर्ड थाटल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. यावर ते म्हणाले, बांधकाम परवानगी व इतर बाबी चौकशीनंतर समोर येतील. 

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद