शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
2
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
3
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
4
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
5
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
6
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
7
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
8
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
9
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
10
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
11
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
13
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
14
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
15
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
16
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...
17
क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत
18
Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
19
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
20
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर

मांगीरबाबा यात्रेस मध्यरात्री महाआरतीने सुरुवात; सलग चौथ्या वर्षी गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:53 IST

नवस केलेल्या महिला व पुरुषांना वाजतगाजत मंडपाप्रमाणे चारही बाजूला कापड धरून दर्शनाला नेले जात होते.

- श्रीकांत पोफळेकरमाड : नवसाला पावणारा देव म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांगीरबाबाच्या यात्रेला बुधवारी मध्यरात्री महाआरतीने सुरुवात झाली. गुरुवारी पहिल्या दिवशी यात्रेमध्ये भाविकांची सुमारे ७० ते ७५ टक्के घट बघायला मिळाली. शुक्रवारपासून भाविकांच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज देवस्थान समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, सरपंच पुष्पा कचकुरे, उपसरपंच सर्जेराव कचकुरे ग्रामपंचायत व देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. सलग तिसऱ्या वर्षी गळटोचणी प्रथा बंद झाल्यानंतर गुरुवारी ५०१ बोकडांचा, तर २०५ कोंबड्यांचा नैवेद्य मांगीरबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कोरोनानंतर सलग चौथ्या वर्षी गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद असल्याचे बघायला मिळाले. भाविकांची संख्या कमी असल्यामुळे मांगीरबाबा कमानीतून शेंद्रा गावात जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

गुरुवारी पहाटेपासून नवस फेडणारे भाविक मंदिराकडे अनवाणी जात होते. नवस केलेल्या महिला व पुरुषांना वाजतगाजत मंडपाप्रमाणे चारही बाजूला कापड धरून दर्शनाला नेले जात होते. यात्रा परिसरात रहाटपाळणे, मौतका कुंवा, तसेच अनेक खेळण्या यात्रेत आल्या आहेत. मांगीरबाबांचे फोटो, गाण्याच्या सीडी, प्रसादाचे साहित्य, सौंदर्यप्रसाधने, रसवंती, कपडे, साड्या, टोप्या, पर्स, आदी दुकानांमध्ये गर्दी होती. यावेळी देवस्थान समितीचे वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, योगेश कचकुरे, संदीप दांडगे, किशोर शेजूळ भाविकांना मार्गदर्शन करीत होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरपंच पुष्पा कचकुरे, उपसरपंच सर्जेराव कचकुरे, जावेद पठाण, रवी गिरी, हौसाबाई नाईकवाडे, शंकर नाईकवाडे, संजय भगुरे, बाळू कचकुरे परिश्रम घेत होते.

संबंधित शासकीय विभागाकडून सोयी-सुविधाकुठलाही अनुचित प्रकार घडू नये व वाहतूककोंडी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत. आरोग्य विभागाची सेवा २४ तास उपलब्ध आहे. ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या वतीने जागोजागी ध्वनिक्षेपकावर मार्गदर्शन केले जात होते. सूचनाफलक, दिशादर्शक फलक लावलेले आहेत. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित शासकीय विभागाकडून कर्तव्य बजावले जात होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर