शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी केली परीक्षाच मॅनेज; औरंगाबादमध्ये एमबीएचा प्रथम सत्राचा पेपर फुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 13:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीएमच्या प्रथम सत्राचा पेपर आज सकाळी सिडको येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात फुटला. पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच  'अकौटिंग फॉर मॅनेजर' हा पेपर परीक्षार्थींच्या मोबाईलवर आला होता. 

ठळक मुद्देशिपायांनी पकडले विद्यार्थ्यांना'फ्युचर मॅनेजर' या ग्रुप वर आला पेपर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीएमच्या प्रथम सत्राचा पेपर आज सकाळी सिडको येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात फुटला. पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच  'अकौटिंग फॉर मॅनेजर' हा पेपर परीक्षार्थींच्या मोबाईलवर आला होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे २६ डिसेंबरपासून एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. आज 'अकौटिंग फॉर मॅनेजर' या विषयाचा पेपर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सुरु होता. यावेळी देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा केंद्रावर होता. दहा वाजता पेपर सुरु झाला असता परीक्षा केंद्राच्या आवारात असलेल्या दोघाजणांच्या मोबाईलवर अवघ्या सहा मिनिटातच पेपरचा स्नॅप आला.'फ्युचर मॅनेजर' या ग्रुपवर पेपरचा स्नॅप आल्यानंतर ही दोघे  झाडाखाली बसून उत्तर लिहित होती.

या दरम्यान १० वाजून १२ मिनिटाला महाविद्यालयाचे शिपाई सतीश पवार, हनुमंत कोरडे, रवी गवळी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. तेव्हा त्यांनी तत्काळ द्या विद्यार्थ्यांना पकडले.  अधिक चोकशी करत शिपायांनी पेपरचा स्नॅप ज्या विद्यायार्थ्यानी पाठवला होता त्याचा डीपी पाहून केंद्रातील परीक्षार्थी विद्यार्थ्यास पकडले. हॉल नंबर ६ मध्ये सापडलेल्या या परीक्षार्थीने तत्काळ हॉल तिकीट फाडून टाकले. त्यानंतर पकडलेल्या तिघांना शिपायांनी प्राचार्यांच्या समोर हजर करण्यात आले. 

या घटनेची माहिती मिळताच परीक्षा व मुल्यमापन नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव डॉ. प्रताप कुलावंत, प्राचार्य मजहर फारुखी यांनी घटनास्थळी भेट दिली. आजचा पेपर विद्यापीठाकडून रद्द करण्यात आला आहे. पेपर फुटीची माहिती मिळताच महाविद्यायात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.  

पोलीस तक्रार करण्यात येईल आज पेपर रद्द केला आहे. सहा केंद्रावर पेपर सुरु आहेत. पोलिस तक्रार करण्यात येईल. विद्यापीठाचीही समिती नेमण्यात येईल.- दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मुल्यमापन नियंत्रण मंडळ,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद