शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून एकाचा विहिरीत ढकलून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 18:35 IST

जालना जिल्ह्यातील मौजपुरी परिसरात आढळला मृतदेह

औरंगाबाद : ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

विजय देवीदास सुर्वे (४१, रा. शंभूनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी पुष्पा या औरंगाबादमधील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. ९ एप्रिल रोजी पुष्पा सुर्वे या कामावरून घरी आल्या असता मनोज शहादेव गवळी (रा. इंदिरानगर) आणि विजय सुर्वे यांच्यात वाद सुरू होता. गवळी हा विजय यांना सोबत चल म्हणून हट्ट करीत होता. त्यानंतर विजय सुर्वे पत्नीची दुचाकी (एमएच-२० डीवाय-५७९४) घेऊन निघून गेले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. 

याबाबत त्यांच्या पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. १२ एप्रिल रोजी मनोज गवळी दोन वेळा सुर्वे यांच्या घरी गेला. त्याने विजय सुर्वेबाबत पुष्पाकडे विचारणा केली. तसेच सावरगाव (जि. जालना) येथे चला तीन तासांत विजय कुठे आहे ते दाखवतो, असेही मनोज गवळीने त्यांना सांगितले. त्यामुळे मनोज गवळीवर सुर्वे कुटुंबियांचा संशय बळावला होता. याच दरम्यान मौजपुरी ठाण्यातून पुष्पा सुर्वे यांच्या भावाला पोलिसांचा फोन आला. त्यांनी खात्री केल्यानंतर विहिरीतील मृतदेह विजय सुर्वे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मनोज गवळीविरुद्ध जालना जिल्ह्यातील मौजपुरी ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर तो जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला  आहे.