शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

राज्यातील प्रत्येक कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे एक पद निर्माण करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:02 IST

राज्यातील प्रत्येक कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे एक पद एका महिन्यात निर्माण करण्याचे आदेश न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिले आहेत.

औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे एक पद एका महिन्यात निर्माण करण्याचे आदेश न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिले आहेत.निर्माण झालेली टंकलेखकांची ही १८०१ पदे त्यानंतर एक महिन्यात भरण्याचेही आदेश खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या प्रासकीय विभागाला दिले आहेत. राजेंद्र रामाजी ढवळे व इतर कनिष्ठ न्यायालयातील लघुलेखकांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत प्रातिनिधिक स्वरूपात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार न्या. शेट्टी आयोगाच्या शिफारशी एक वर्षात लागू करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २००३ साली दिला होता. महाराष्टÑाशिवाय देशातील इतर राज्यांत या आदेशाची अंमलबजावणी झाली. लघुलेखकांनी २०१३ साली मुंबईला दाखल केलेली ही याचिका २०१५ साली औरंगाबाद खंडपीठाकडे हस्तांतरित करण्यात आली. न्या. शेट्टी आयोगाचे प्रस्ताव जिथे कुठे प्रलंबित असतील तिथे तीन महिन्यांत अंमलबजावणी करावी, असा दुसरा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती.१५ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ते सत्र न्यायालयांपर्यंत) ४५ दिवसांत त्रिस्तरीय स्टेनोग्राफर्सची पद्धत अंमलात आणावी, असा आदेश उच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारीला दिला होता. त्यानंतर १ मार्च रोजी टंकलेखकांची पदे भरण्याबाबत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा एस. तळेकर, शासनातर्फे विशेष सरकारी वकील व्ही.जे. दीक्षित आणि उच्च न्यायालयातर्फे अ‍ॅड. राजेंद्र एस. देशमुख यांनी काम पाहिले.>न्या. शेट्टी आयोगाच्या शिफारशीन्या. शेट्टी आयोगाने केलेल्या शिफारशींमध्ये म्हटल्यानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये त्रिस्तरीय न्याय व्यवस्था आहे. पूर्वी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयातील लघुलेखक प्रवर्ग रद्द केला होता. आता त्यांनाही लघुलेखक द्यावेत.प्रत्येक न्यायाधीशाला लघुलेखकांव्यतिरिक्त एक टंकलेखकसुद्धा द्यावा.आकर्षक पगार द्यावा आणि प्रवास भत्ता वाढवावा. जेणेकरून चांगले व सक्षम लोक मिळतील व न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे कमी होतील. या कर्मचाऱ्यांना बढतीची संधी नाही, म्हणून त्यांना ‘स्विच ओव्हर’ द्या.प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना उच्च श्रेणी दर्जाचे लघुलेखक कार्यकारी सहायक म्हणून द्यावेत.