शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या ऑनलाईनच करा; शिक्षक संघटनांची शासनाच्या अभ्यासगटासमोर मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 11:59 IST

शिक्षकांच्या सर्व संघटनांची राज्य शासनाच्या अभ्यासगटासमोर मागणी

ठळक मुद्देया बैठकीत ४० पेक्षा अधिक शिक्षक संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट नेमला

औरंगाबाद : शिक्षकांच्या बदल्यांमागील ‘अर्थकारण’ आणि वशिलेबाजी रोखण्यासाठी आधीप्रमाणे ऑनलाईनच बदल्या कराव्यात, अशी मागणी राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यासगटासमोर सोमवारी सर्व शिक्षक संघटनांनी केली. ऑनलाईन बदल्यांवर आक्षेप आल्यामुळे नूतन सरकारने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट नेमला आहे. या अभ्यासगटाची पहिली बैठक पुण्यात  सोमवारी झाली. या बैठकीत ४० पेक्षा अधिक शिक्षक संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. अभ्यासगटाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष पीयूष प्रसाद यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. 

शिक्षकांच्या मागण्या काय ?१. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ मधील कलम ८ (६) नुसार मूळ प्रवर्ग व निवड प्रवर्ग, असे दोन पर्याय पर्याय शिक्षकांना द्यावेत, १० टक्के मनुष्यबळाची अट लावून कोणाताही जिल्हा बदली प्रक्रियेतून वगळू नये, साखळी बदल्या कराव्यात, किमान दोन जिल्ह्यांचा पर्याय ठेवावा, आंतरजिल्हा बदल्यांसाठी राज्यरोस्टर, शून्य बिंदुनामावली करावी, लगतच्या जिल्ह्यातील पती-पत्नीला सार्वत्रिक बदल्यांत एकत्रीकरणाचा लाभ द्यावा, आदी मागण्या खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघातर्फे केल्याची माहिती सनीदेवल जाधव यांनी दिली. 

२. पहिल्या टप्प्यापासून आंतरजिल्हा बदली होऊनही अद्याप कार्यमुक्त न केलेल्या कोकणातील शिक्षकांना लवकरात लवकर कार्यमुक्त करावे, संवर्ग- १ मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांना एका शाळेवर कमीत कमी ३ वर्षे सेवा करण्याची मुदत असावी, दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असलेल्या जिल्हा परिषदमधील शिक्षकांचा समावेश आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक-४ मध्ये केला जाणार नाही, ही अट वगळून त्या शिक्षकांचा/ जिल्ह्यांचा समावेश बदली टप्पा क्रमांक ४ मध्ये करण्यात यावा, बिंदुनामावली रोस्टर हे जिल्ह्यावर न ठेवता ते विभागावर, राज्यवार करण्यात यावे. बदलीपात्र शिक्षकाला पाच जिल्ह्यांचा पर्याय देण्याचा विचार व्हावा, आदी मागण्या करण्यात आल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद