शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ओबीसी समाजामध्ये जगजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:05 IST

आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देगंगाधर बनबरे : डॉ. आंबेडकर नायक पुरस्कार वितरण समारंभ

औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक- २०१९’ या राज्यस्तरीय वाचन, लेखन व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संत तुकाराम नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, जीएसटीचे उपायुक्त रवी जोगदंड, आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात होते.यावेळी बनबरे आपल्या भाषणात म्हणाले, सर्वांनी अगोदर बाबासाहेबांनी लिहिलेले मूळ ग्रंथ वाचले पाहिजेत. बाबासाहेबांनी लिहिलेला ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हा शिवाजी महाराजांसंबंधी धर्माची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. अलीकडे मराठा-दलित हे एकमेकांचे शत्रू आहेत, असे चित्र उभे केले जात आहे; परंतु राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केळूस्कर गुरुजी यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध दोन्ही समाजाने समजून घेतला पाहिजे. ओबीसी समाज आपल्यापासून का दुरावला, याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. थेट देवा-धर्माबद्दल टोकाची भूमिका न घेता मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने धर्म आणि मंदिराचा आपला संबंध आहे; पण बडव्यांना आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेतली आहे.वक्त्यांच्या भाषणानंतर विजेत्या स्पर्धकांना माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात वाचन, लेखन आणि वक्तृत्वाच्या आधारे सामाजिक परिवर्तन केले. त्यांचे अनुकरण आंबेडकरी समाजातील युवकांनीही करावे, स्पर्धेच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या साहित्य वाचनाची सवय लागावी म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती. सात राज्यांतील २ हजार ७६५ जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६५१ युवकांची परीक्षेसाठी निवड केली होती. शंभर गुणांच्या या परीक्षेला ४०० जण बसले होते. नागपूर, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या चार विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण घेणाऱ्या ४७ जणांची वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात रविवारी दिवसभर ही स्पर्धा झाली. त्यानंतर विजेत्यांची निवड जाहीर केली.

टॅग्स :SocialसामाजिकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर